मुंबई : आयटी (IT) क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोने (Wipro) 300 कर्मचाऱ्यांना मूनलाइटिंगमुळे (moonlighting) म्हणजेच प्रतिस्पर्धी कंपन्यांसाठी काम केल्यामुळे कामावरून काढून टाकलं आहे. विप्रोचे (Wipro) अध्यक्ष ऋषद प्रेमजी यांनी ही माहिती दिली आहे.
एका कार्यक्रमादरम्यान प्रेमजी म्हणाले की, "गेल्या काही महिन्यांत आम्ही 300 लोकांची ओळख पटवली जे एकाच वेळी दुसर्या कंपनीत सेवा देत होते. या लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे." (300 employees who were cheating Wipro fired by the company)
मूनलाइटिंगमुळे (moonlighting) आयटी कंपनीने (IT Companies) मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी विप्रोचे (Wipro) चेअरमन ऋषद प्रेमजी यांनी कर्मचाऱ्यांच्या मूनलाइटिंगला कंपनीची फसवणूक म्हटले होते.
माध्यमांच्या वृत्तानुसार, विप्रोने (Wipro) काही दिवसांपूर्वी मूनलाइटिंगबाबत (moonlighting) इशारा दिला होता. कंपनीने कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले होते की, दोन ठिकाणी काम किंवा 'मूनलाइटिंग'ला परवानगी नाही. कराराचा कोणताही भंग शिस्तभंगाच्या कारवाईच्या अधीन असेल आणि त्याचा परिणाम म्हणजे तुमचं काम संपुष्टात येऊ शकते.
मूनलाइटिंग (moonlighting) म्हणजे काय?
जेव्हा एखादा कर्मचारी पैसे मिळवण्यासाठी त्याच्या नियमित नोकरीशिवाय इतर काम करतो, तेव्हा त्याला तांत्रिकदृष्ट्या मूनलाइटिंग (moonlighting) म्हणतात. कोरोनाच्या काळात त्याचा ट्रेंड (Trend) वाढला आहे. तज्ज्ञांच्या मते, आयटी कंपन्यांमध्ये (IT Companies) घरून काम (Work from Home) केल्यामुळे कर्मचाऱ्यांना मूनलाइटिंगची संधी मिळाली आहे.
नव्या वादाला फुटले तोंड
आयटी व्यावसायिकांमध्ये मूनलाइटिंगच्या वाढत्या ट्रेंडने उद्योगात नव्या वादाला तोंड फोडले आहे. अलीकडेच इन्फोसिसने (infosys) आपल्या कर्मचाऱ्यांना अंतर्गत मेलद्वारे मूनलाइटिंगबाबत इशारा दिला होती. त्याचबरोबर आयबीएम (IBM) आणि टीसीएसनेही (TCS) मूनलाइटिंगबाबत आक्षेप घेतला आहे.