श्रीनगर : श्रीनगरमधील करण नगर भागात दहशतवाद्यांनी आज केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) पथकावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात सहा जवान जखमी झाले असल्याचे वृत्त वृत्तसंस्थाने एएनआयने दिले आहे. सीआरपीएफचे एक पथक तपासणी नाक्यावर तैनात असतानाच सायंकाळी सातच्या सुमारास दहशतवाद्यांनी या पथकावर हल्ला केला.
ग्रेनेड स्फोटात जखमी झालेल्या सहा जवानाना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रेनेड फेकून दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर नाकेबंदी करण्यात आली असून करण नगरमधील सर्व रस्त्यांवर जोरदार शोध मोहीम सुरु आहे.. जखमी जवान सीआरपीएफच्या १४४ व्या बटालियनमध्ये सेवेत असल्याचेही सांगण्यात येत आहे.
Jammu and Kashmir: 6 CRPF personnel injured in grenade attack by terrorists in Srinagar's Karan Nagar. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/z0uaozQIkn
— ANI (@ANI) October 26, 2019
दरम्यान, बुधवारी कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या पथकावर ग्रेनेड हल्ला केला होता. त्या हल्ल्यात एक जवान जखमी झाला होता.