लग्न ठरवताना दोन्ही बाजूचे कुटुंबीय सर्व प्रकारची चौकशी करत हे स्थळ योग्य आहे का? याची पाहणी करत असतात. पण अनेकदा काही कारणास्तव या चर्चा फिस्कटतात आणि ठरणारं लग्न मोडू लागतं. यामध्ये अनेकदा पगार, पैसा हाच कळीचा मुद्दा असतो. आजकाल मुली स्वावलंबी असल्याने आपल्याला जास्त पगार नको, पण साथ देणारा जोडीदार हवा असं सांगतात. पण प्रत्येक मुलगी पैशांचा विचार करतच नाही असं नाही. याचाच प्रत्यय देणारी एक पोस्ट सध्या सोशल मीडियवर तुफान व्हायरल झाली आहे. पुरुषांच्या हक्कासाठी लढणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याने आपला अनुभव शेअर केला आहे. यावेळी त्याने सोबत संभाषणाचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत.
तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, मॅट्रिमोनिअल साईटवर त्याला पसंत केलेल्या मुलीला जेव्हा त्याचा वार्षिक पगार 30 लाख नव्हे तर 3 लाख आहे कळलं तेव्हा तिने त्याला शिवीगाळ कऱण्यास सुरुवात केली. जोपर्यंत मुलीली त्याचा पगार माहिती नव्हता तोपर्यंत ती त्याला लवकर साखरपुडा करण्यासाठी सांगत होती. मात्र सत्य कळताच क्षणात सर्व गोष्टी बदलल्या.
जोपर्यंत आपण टायपिंगमध्ये झालेली चूक लक्षात आणून दिली नाही तोपर्यंत सर्व काही ठीक होतं असं त्याने सांगितलं आहे. एक्सवर त्याचं कीश सिफ असं नाव आहे. सेव्ह इंडियन फॅमिली फाऊंडेशन या पुरुषांच्या हक्कांच्या एनजीओमध्ये सल्लागार असल्याचं त्याच्या बायोमध्ये लिहिलं आहे.
— Kish Siff (@KishwarSiff) October 26, 2024
स्क्रीनशॉटमध्ये ती मुलगी तरुणाला लवकर साखरपुडा करण्यासाठी वितारणा करत असल्याचं दिसत आहे. आपलं हे दुसरं लग्न असल्याने तरुण सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत एकमेकांना जाणून घेण्यासाठी वेळ घेऊयात असं सुचवतो. तेव्हा तरुणीने “थांबू शकत नाही किंवा दुसरं मॅच शोधूया” असं सांगते.
यानंतर तरुण तिला नोव्हेंबरच्या मध्यात साखरपुडा करु शकतो असं सांगतो. त्यानंतर तो तिला माझ्याकडून टायपिंगमध्ये चूक झाली असून वार्षिक पगाराच्या आकड्यात एक शून्य अधिक पडल्याचं सांगतो. माझा वार्षिक पगार 30 लाख नव्हे, तर 3 लाख आहे असं तो सांगतो. यानंतर तरुणी संतापते आणि शिवीगाळ सुरु करते.
https://t.co/W7fdelZCo7 pic.twitter.com/bcKbJJkwD0
— Kish Siff (@KishwarSiff) October 26, 2024
यानंतर तरुणीची आई त्याच्याशी संवाद साधण्यास सुरु करते. यावेळी तिचा पारा चढलेला असतो. मी तुझ्यासह अख्ख्या कुटुंबाला पोलीस ठाण्यात नेईन. मी माझ्या जावयासोबत काय केलं आहे याची तुला कल्पना नाही अशा शब्दांत ती त्याला धमकावते. यानंतर तरुण सांगतो की, त्याला न्यायालयाच्या आदेशावरून कळलं आहे की तिला तिच्या माजी पतीकडून आधीच मोठी पोटगी मिळत आहे.
यानंतरही जेव्हा महिला वाद घालत असते तेव्हा तरुण तिला आपण सुप्रीम कोर्टात वकील असून तुला फार महागात पडू शकतं असा इशारा देतो. यानंतर महिला घाबरते. या संवादाचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर नेटकरी त्यावर कमेंट करत असून गोल्ड डिगर म्हटलं आहे. अनेकांनी मॅट्रिमोनिअल साईटवर सुरु असणारे असे फसवणुकीचे प्रकार समोर आणल्याबद्दल आभार मानले आहेत.