Akshata Murty fashion at G20 Summit: 8,9,10 सप्टेंबर रोजी दिल्ली होणाऱ्या G20 Summit यासाठी जगातील राष्ट्रप्रमुखांनी उपस्थिती दर्शवली आहे. यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सपत्नीक हजेरी लावली होती. नारायण मुर्ती आणि सुधा मुर्ती यांच्या कन्या अक्षता मुर्ती या ऋषी सुनकच्या पत्नी आहेत. 2009 साली त्यांचे लग्न झाले होते. यावेळी त्यांच्याकडेच सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. सोबत यावेळी त्यांच्या फॅशनचीही चर्चा होती. अक्षता मुर्ती या त्यांच्या साध्या परंतु एलिगंट फॅशनसाठी ओळखल्या जातात. यावेळी त्यांनी परिधान केलेल्या आगळ्यावेगळ्या फॅशनची चर्चा आहे. त्या स्वत: फॅशन डिझायनर आणि उद्योजिका आहेत. त्यामुळे त्यांची चर्चा असते. त्या सोशल मीडियावरही फार सक्रिय आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरही त्या आपले फोटो शेअर करताना दिसतात.
यावेळी खासकरून त्यांची चर्चा आहे ते म्हणजे त्यांनी जी-20 ला परिधान केलेल्या इंडो वेस्टर्न लुकची. काल ऋषी सुनक अक्षता मुर्ती यांच्यासह भारतात आले. तेव्हा अक्षता मुर्ती यांनी व्हाईट शर्ट आणि सुंदर असा डिझानयर लॉन्ग स्कर्ट परिधान केला होता. त्यामुळे त्यांच्याकडे सगळ्यांच्या नजरा वळलेल्या दिसल्या होत्या. यावेळी त्यांनी फ्युजन आऊटफिट परिधान केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून इंडो - वेस्टर्न लुकची, फॅशनची क्रेझ आहे. राजस्थान, दिल्ली सारख्या शहरात आल्यावर जास्तकरून असा लुक फार सुट होतो. त्यातून गेल्या काही दिवसांपासून ही फॅशन थोडी कमी प्रमाणात तरूणाईमध्ये दिसते आहे. त्यातून थोडी क्रेझही काहीशी कमी झालेली दिसते आहे. परंतु अक्षता मुर्ती यांनी यावेळी इंडो वेस्टर्न लुक करून त्याची परत आठवत करून दिली असं म्हटलं तर हरकत नाही.
हेही वाचा : ट्विंकल खन्ना नाही, 'या' दोन खास व्यक्तींसोबत अक्षय कुमारची महाकालेश्वरला भेट; देवाकडे काय मागितलं असेल?
जेव्हा अक्षता मुर्ती या दिल्लीत आल्या तेव्हा त्यांनी हाच इंडो वेस्टर्न लुक कॅरी केला होता. यावेळी त्यांनी फ्लोअर मॅक्सी स्कर्ट आणि क्रिस्प व्हाईट शर्ट असा लुक केला होता. यावेळी साधा मेकअप लुक आणि केस त्यांनी मोकळे सोडले होते.