नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी आज लोकसभेत आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केलीय.
राज्यघटनेतून धर्मनिरपेक्ष हा शब्द काढून टाकण्यासाठीच आम्ही सत्तेवर आलो आहोत, असं विधान हेगडेंनी जाहीर सभेत केलं होतं. त्याचप्रमाणं प्रत्येकानं आपली ओळख धर्मनिरपेक्ष अशी न सांगता, आपल्या जाती आणि धर्मावरून सांगावी, असं विधानही त्यांनी केलं होतं.
या विधानावर काँग्रेससह विरोधी पक्षांनी टिकेची झोड उठवली होती. काल लोकसभेत यावरून गदारोळही झाला होता. ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचं इतर भाजप खासदारांनी सांगितलं होतं. या सगळ्यानंतर आज अखेर हेगडेंनी आपल्या त्या विधानाबद्दल लोकसभेत दिलगिरी व्यक्त केली.