CBSE कडून 2024-25साठीचा अभ्यासक्रम जाहीर; नव्या Syllabus सह 'हे' आहेत महत्त्वाचे बदल

CBSE board exams 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)ने 2024-25 साठीचा अभ्यासक्रम जाहिर केला आहे. तुम्ही अधिकृत लिंकवर क्लिक करुन माहिती घेऊ शकता.   

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 26, 2024, 11:17 AM IST
CBSE कडून 2024-25साठीचा अभ्यासक्रम जाहीर; नव्या Syllabus सह 'हे' आहेत महत्त्वाचे बदल title=
CBSE Releases Syllabus For Classes 9, 12 For Academic Year 2024-25

CBSE board exams 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसईने शैक्षणिक सत्र 2024-25 साठीचा दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. त्याचबरोबर नवीन सत्र 1 एप्रिल 2024 पासून सुरू होणार आहे. सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा संपल्या असून बारावीच्या परीक्षा 2 एप्रिल रोजी संपणार आहेत. मात्र या परीक्षांचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच सीबीएसईने आभ्यासक्रम जाहिर केला आहे. 

नवीन अभ्यासक्रमानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांना 5 विषय सक्तीचे असणार आहेत. त्याचबरोबर दोन ऐच्छिक विषयही देण्यात येणार आहेत. तसंच, बारावीसाठी 7 विषय अनिर्वाय करण्यात आले आहेत. यंदा सीबीएसईने अभ्यासक्रमाचे वर्गीकरण केले आहे. माध्यमिक आणि वरिष्ठ या दोन श्रेणींमध्ये विभागला गेला आहे. माध्यमिक अभ्यासक्रम म्हणजे 9 ते 10 आणि वरिष्ठ माध्यमिक म्हणजे इयत्ता 11 आणि 10 या पद्धतीने श्रेणींमध्ये विभागण्यात आला आहे. सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन विद्यार्थी याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ शकतात. 

इयत्ता 10वी साठी पाच विषय अनिवार्य असतील तर दोन ऐच्छिक असतील. तर, इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमात भाषा, मानविकी (Humanity), गणित, विज्ञान, कौशल्य विषय, सामान्य अध्ययन आणि आरोग्य आणि शारीरिक शिक्षण यासह सात मुख्य विषयांचा समावेश आहे. 

2024-25 साठी CBSE इयत्ता दहावी आणि बारावी अभ्यासक्रमासाठी सूचना

सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर www.cbseacademic.nic.in वर जाऊन शैक्षणिक टॅबवर क्लिक करा

'सत्र 2024-25 साठी माध्यमिक आणि वरिष्ठ शालेय अभ्यासक्रम' या टायटलवर क्लिक करा

PDF फाइल उघडण्यासाठी लिंकवर क्लिक करा 

ही PDF फाइल डाऊनलोड करुन ठेवा. पुढील प्रक्रियेसाठी या फाइलची प्रिंट करुन ठेवा. 

सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आगामी शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता तिसरी आणि सहावीसाठी नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके सादर करण्यात येणार आहे. तर, उर्वरित इयत्तांचा अभ्यासक्रम आधीच्याच पाठ्यपुस्तकांसह सुरू राहणार आहेत.