रशिया - युक्रेन युद्धाचा तडका; आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भडका

Petrol Disel price today | crude oil in India | युक्रेन-रशियातल्या संघर्षानं कच्च्या तेलाचे भाव कडाडले आहेत. भारत आयात करत असलेल्या ब्रेंट कच्च्या तेलाचे दर 107 डॉलर्सच्या वर गेलेत.

Updated: Mar 2, 2022, 10:11 AM IST
रशिया - युक्रेन युद्धाचा तडका; आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भडका title=

मुंबई :  युक्रेन-रशियातल्या संघर्षानं कच्च्या तेलाचे भाव कडाडले आहेत. भारत आयात करत असलेल्या ब्रेंट कच्च्या तेलाचे दर 107 डॉलर्सच्या वर गेलेत. अमेरिका आणि आशियाई शेअर बाजारावरही युद्धामुळे मंदीचं सावट कायम आहे. भारतीय शेअर बाजारावरही याचे विपरीत परिणाम अपेक्षित आहे..  

भारतात उत्तर प्रदेशासह पाच राज्यांच्या निवडणूका आहेत. त्यानंतर जागतिक बाजारात वाढलेल्या कच्च्या तेलाच्या दरांचा परिणाम भारतातही दिसून येईल असे जाणकारांचे म्हणणे आहे. भारतातही 6 मार्च नंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा भडका उडून महागाई वाढण्याची चिन्हे आहेत.

सोन्याचे दरही वधारले

भारतातील मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा भाव 1100 रुपये प्रति तोळेने वधारला आहे. तर चांदी 2500 रुपये प्रति किलोने वधारली आहे.

रशिया - युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजाराच्या अर्थकारणाला फटका बसला आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये इंधन आणि सोन्याचे भाव वाढले आहेत

युद्धाचा परिणाम भारतावरही दिसून येत आहे. त्यामुळे सोन्याचे भाव 1100 रुपये प्रतितोळेने वाढून 51800 रुपयांच्या पुढे गेले आहे. तर चांदी देखील 2500 रुपयांनी वाढून 68400 रुपये प्रति किलोवर पोहचले आहे.