दर महिन्याला हजारोंची कमाई; शुन्य रुपये गुंतवणूकीवर सुरू करा हा सुपरहीट बिझनेस

तुम्ही सरकारी फ्रेंचाइजी (Franchise) सुरू करून स्वतःचा स्टार्टअप बिझनेस सुरू करू शकता

Updated: Oct 10, 2021, 04:38 PM IST
दर महिन्याला हजारोंची कमाई; शुन्य रुपये गुंतवणूकीवर सुरू करा हा सुपरहीट बिझनेस title=

नवी दिल्ली : कोरोना काळात जर तुम्हाला कोणतीही गुंतवणूक न करता दर महिन्याला चांगला नफा देणारा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर आम्ही तुमच्यासाठी खास व्यवसायाची आयडीया घेऊन आलो आहोत. 

तुम्ही सरकारी फ्रेंचाइजी (Franchise) सुरू करून स्वतःचा स्टार्टअप बिझनेस सुरू करू शकता. या व्यवसायात गुंतवणूकीचीही गरज नाही. तसेच नुकसान देखील शक्यतो होत नाही.

आधार कार्ड फ्रेंचाइजी
आज काल देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आधार कार्ड गरजेचे डॉक्युमेंट आहे. त्यामुळे याची मागणी असतेच. तुम्ही आधार कार्ड फ्रेंचाइजी सुरू करू शकता. यासाठी सर्वात आधी तुम्हाला UIDAI कडून घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे आहे. त्यानंतर सर्विस सेंटर सुरू करण्याचा परवाना प्राप्त होते. 

अप्लाय कसे करावे
1 आधार फ्रेंचाइजी परवाना मिळवण्यासाठी सर्वात आधी NSEITच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच https://uidai.nseitexams.com/UIDAI/LoginAction_input.action वर भेट द्या

2 Create New User या पर्यायावर क्लिक करा

3 पुढे शेअर कोड साठी https://resident.uidai.gov.in/offline-kyc वर जाऊन ऑफलाइन ई आधार कार्ड डाऊनलोड करावा लागेल.

4 डाऊनलोड झाल्यानंतर XML File आणि Share Code दोन्ही डाऊनलोड होतील.

5 दरम्यान तुमच्यासमोर स्क्रिन वर एक फॉर्म उघ़डेल. यामध्ये आवश्यक माहिती भरा आणि सबमिट करा

6 तुमच्या ई मेल आयडीवर user id आणि passward येईल. आता तुम्ही 'Aadhaar Testing and Certification' च्या पोर्टलवर सहजतेने लॉगइन करू शकता. त्यानंतर तुमच्यासमोर Continue चा पर्याय असेल त्यावर क्लिक करा

7 येथे ओपन झालेल्या फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरा. ज्यानंतर फोटो आणि डिजिटल हस्ताक्षर अपलोड करा. त्यानंतर 'Proceed To Submit Form' वर क्लिक करा