Gold Price Today: आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या दरम्यान सोनं-चांदीचे भाव कोसळले आहेत. सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत घट झाल्याने ग्राहकांना आता कमी दरात सोनं खरेदी करण्याची संधी आहे. वायदे बाजारातदेखील सोनं-चांदीच्या दरात नरमाई पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात जरी सोनं-चांदीचे दर वधारले असले तरी घरगुती वायदे बाजारात नरमाई दिसून येत आहे. वायदे बाजारात सोनं आज सकाळी 33 रुपयांनी घसरलं आहे. आज प्रतितोळा सोनं 77,378 रुपयांवर स्थिरावले आहेत. तर, चांदीच्या दरात 92 रुपयांची घसरण झाली असून चांदी 92,221 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहेत.
राष्ट्रीय राजधानी सराफा बाजारात बुधवारी सोनं-चांदीच्या दरात घसरण झाली होती. सोनं 1650 रुपयांनी घसरलं होतं. 80 हजारांच्या खाली सोनं ट्रेड करत होतं. बाजारातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक दागिने विक्रेत्यांची कमी मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील नरमाई यामुळं मौल्यवान धातुच्या दरात घट झाली आहे.
आज शुक्रवारी सराफा बाजारात 24 कॅरेट सोनं प्रतितोळा 78,700 रुपयांवर स्थिरावलं आहे. तर, 22 कॅरेट सोनं प्रतितोळा 72,140 रुपयांवर स्थिरावलं आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,990 रुपये प्रतितोळा इतके आहे. तर, 24 कॅरेट सोन्याची किंमत 78,550 रुपयांवर स्थिरावली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून डॉलर इंडेक्स आणि बॉण्ड यिल्ड मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या दरात घसरण होत होती. पण काल सोन्याच्या दराने पुन्हा उसळी घेतली. जागतिक बाजारपेठेत सोने 2700 डॉलरच्या वर पोहोचले होते. डॉलर निर्देशांकातील घसरणीमुळे सोन्याला आधार मिळाला. डॉलर 105 च्या खाली घसरला आहे. एमसीएक्सवरही सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यात एक हजार रुपयांची वाढ झाली होती.