मुंबई : भारतातील सर्वात मोठ्या शहरांमध्ये सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. दिल्लीत मंगळवारी सोन्याच्या दरात 152 रुपयांनी घट पाहायला मिळाली. आज 10 ग्रॅम सोन्याचा दर 48,107 रुपये आहे. कोरोनाचे कमी होणारे आकडे आणि अर्थव्यवस्थेत होणारा बदल यामुळे गुंतवणूकदार सोने कमी प्रमाणात खरेदी करताना दिसत आहेत. तसेच वैश्विक स्तरावर देखील सपोर्ट मिळत नाही. काही दिवसांपूर्वी सोन्याचा दर 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 48,259 रुपयांवर बंद झाला होता.
चांदीचा दर हा 540 रुपयांनी कमी झाला आहे. चांदीचा दर 69,925 रुपये प्रति किलो आहे. गेल्या सत्रात चांदीचा दर हा 70,465 रुपये प्रति किलो होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर 1,883 डॉलर प्रती तर सोन्याच्या दरात 27.55 डॉलर प्रति टक्के झाली आहे.
Good Returns संकेतस्थळानुसार देशातील प्रमुख शहरात सोन्या आणि चांदीचे दर खालील प्रमाणे आहेत. दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,950 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 52,300 रुपये प्रती 10 ग्रॅम आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 47,510 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 48,510 रुपये प्रति ग्रॅम आहे.
कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 48030 रुपये असून 24 कॅरेट सोन्याचा दर हा 50,730 रुपये प्रती ग्रॅम आहे. चेन्नईत सोन्याची किंमत ही 46050 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर हा 50240 रुपये प्रति ग्रॅम आहे.