नवी दिल्ली : आयकर विभागाने शुक्रवारी आयकर विवरण पत्र अर्थात इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी आजा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे करदात्यासाठी आज मध्यरात्रीपर्यंत आयकर विभागाची कार्यालये सुरु राहणार आहेत.
आयटी रिटर्न फाईल करण्याची ३१ जुलै ही शेवटची मुदत होती. पण करदात्यांचा वाढता ओघ लक्षात घेता, प्रशासनाने ही मुदत ५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. ही मुदत आज संपत आहे.
करदात्यांना आयटी रिटर्न भरण्यासाठी येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन, मुदतवाढ देण्यात आली. ही अडचण येऊ नये आणि सर्वांना रिटर्न फाईल्स करता यावी म्हणून मध्यरात्रीपर्यंत कार्यालय सुरु राहणार आहेत. त्यामुळे आज सर्वाना इन्कमटॅक्स रिटर्न भरावाच लागणर आहे.