नवी दिल्ली : रेल्वेतून प्रवास करताना यापुढे तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. प्रवासादरम्यान रेल्वेने बंदी घातलेल्या वस्तू आढळल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो. तसेच, त्याला 3 वर्षापर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो. रेल्वेकडून आलेल्या माहितीनुसार रेल्वेच्या डब्यात रॉकेल, गवत, स्टोव्ह, पेट्रोल आणण्यास मनाई आहे. त्याचबरोबर रॉकेल, गॅस सिलेंडर्स, मॅचबॉक्सेस, फटाके किंवा आग पसरवणाऱ्या इतर ज्वलनशील वस्तूंबरोबर प्रवास न करण्याचा कठोर इशारा देण्यात आला आहे.
रेल्वेने प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी हा नियम बनवण्यात आला आहे
(Official notification of railway)नुकतीच नवी दिल्ली-देहरादून शताब्दी एक्सप्रेसच्या डब्यात आग लागल्याची घटना समोर आली होती. त्याचबरोबर गाझियाबाद स्थानकातही आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटना लक्षात घेता भारतीय रेल्वेने (Indian Railway) प्रवाश्यांसाठी अधिकृत अधिसूचना (Official Notification) जारी केली आहे.
(There is also ban on smoking)रेल्वेने आगीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योजना बनवल्या आहेत. यानुसार एखादी व्यक्ती ट्रेनमध्ये धूम्रपान करताना आढळल्यास त्याला तुरूंगात डांबले जाऊ शकते. याशिवाय दंडही भरावा लागू शकतो. रेल्वेच्या आवारात सिगारेट किंवा बिडी धूम्रपान करणे देखील दंडनीय गुन्हा आहे. असे आढळल्यास प्रवाशांना 200 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
रेल्वेमध्ये प्रवासादरम्यान प्रवाशांनी ज्वालाग्रही साहित्य घेऊ जाऊ नये किंवा कोणालाही ते घेऊ देऊ नये असे ट्विट रेल्वेने केले आहे. जर असे केले तर कायदेशीर कारवाई तसेच तुरूंगातही कारवाई होऊ शकते.
पश्चिम मध्य रेल्वेच्यामते, रेल्वे अधिनियम 1989 च्या कलम 164 नुसार ट्रेनमध्ये आग किंवा ज्वलनशील वस्तू आणणे हा गुन्हा आहे. या गुन्ह्यात आढळलेल्या व्यक्तीस 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्र होऊ शकतात.