मोदींचे कृषी धोरण म्हणजे मोठा बुडबुडा; आरबीआयच्या माजी गव्हर्नरांची टीका

रिजर्व बॅंक ऑफ इंडियाचे (आरबीआय) माजी गव्हर्नर एच आर खान यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशात कृषी कर्ज वाढले पण कृषी उत्पन्न मात्र कमी झाले त्याचे काय? असा सवाल खान यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 22, 2017, 10:26 PM IST
मोदींचे कृषी धोरण म्हणजे मोठा बुडबुडा; आरबीआयच्या माजी गव्हर्नरांची टीका title=

नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे (आरबीआय) माजी गव्हर्नर एच आर खान यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशात कृषी कर्ज वाढले पण कृषी उत्पन्न मात्र कमी झाले त्याचे काय? असा सवाल खान यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

प्रत्येक वर्षी बॅंकांना कृषी कर्ज देण्याबाबतच्या सरकारच्या निर्णयावर खान यांनी तीव्र टीका केली आहे. सरकारचे हे धोरण म्हणजे व्यवस्थेतील सर्वात मोठी जोखीम आहे. तसेच, हे धोरण सद्यस्थितीला बरे वाटत असले तरी, भविष्यातील मोठा बुडबूडा ठरण्याची शक्यता आहे. सरकार जो निर्णय घेते त्याची अंमलबजावणी करण्यासाठी बॅंका प्रचंड सक्रीय राहतात. त्यामुळे सरकारने विचारपूर्वक धोरणे ठरवली पाहिजेत, असेही खान यांनी म्हटले.

व्यापारी संघटनेने आयोजित केलेल्या एका पुरस्कार वितरण कार्यक्रमात खान बोलत होते. या वेळी बोलताना खान म्हणाले की, सरकार देत असलेल्या कृषी कर्जात अल्पकाळासाठी दिलेल्या कर्जाचे प्रमाण अधीक आहे. खरेतर कृषी क्षेत्रात दीर्घकालीन गुंतवणुकीची आवश्यकता अधिक असल्याचे मतही खान यांनी नोंदवले. खान हे गेल्या वर्षी रिझर्व्ह बॅंकेतून सेवानिवृत झाले आहेत.