सुरक्षा दलाची मोठी कारवाई, लष्कर ए तोयबाच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या सोपोर येथे रविवारी रात्री झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. 

Updated: Jun 21, 2021, 07:29 AM IST
सुरक्षा दलाची मोठी कारवाई, लष्कर ए तोयबाच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा title=

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या सोपोर येथे रविवारी रात्री झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. हे तिन्ही दहशतवाद्यांचा दहशतवादी संघटना  लश्कर-ए-तोयबासोबत संबंध होता. पोलीस आणि सीआररपीएफ पथकावर झालेल्या हल्ल्यात लष्कर ए तोयबाच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.  12 जून रोजी झालेल्या या चकमकीत 3 पोलीस अधिकारी आणि 2 सामान्य नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे. 

आयजी विजय कुमार म्हणाले की, सोपोरे हल्ल्यात सामील असलेल्या मुदस्सिरचा पोलीस पथकावर हल्ल्या शिवाय अन्य दहशतवादी कारवायांमध्ये देखील सहभाग होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रथ भागात झालेली चकमक पूर्ण रात्र सुरू होती. सध्या या भागात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.

सांगायचं झालं तर 12 जून रोजी सोपोरमध्येच पोलीस आणि सीआरपीएफच्या पथकावर अरमपुरा येथे हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 3 पोलीस अधिकारी शहीद झाले. तर 2 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. शिवाय या हल्ल्यात 2 निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. 

त्याचप्रमाणे 3 दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी गोळीबार करत एक पोलीस अधिकारी यांची हत्या केली. श्रीनगरमधील ईदगाह भागातील सैदपोरा भागात दहशतवाद्यांनी कॉन्स्टेबल जावेद अहमद यांना त्यांच्या घराजवळ गोळी घालून गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांना जवळच्या शौरा येथील एसकेआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केलं.