Facebookच्या माध्यमातून सापडली हरवलेली म्हैस, जाणून घ्या कसं...

सोशल मीडियाचा वापर कुणी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी करतं तर कुणी प्रसिद्धीसाठी. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून एका व्यक्तीला आपल्या हरवलेल्या म्हशी सापडल्या आहेत.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 9, 2017, 03:57 PM IST
Facebookच्या माध्यमातून सापडली हरवलेली म्हैस, जाणून घ्या कसं... title=

नवी दिल्ली : सोशल मीडियाचा वापर कुणी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी करतं तर कुणी प्रसिद्धीसाठी. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून एका व्यक्तीला आपल्या हरवलेल्या म्हशी सापडल्या आहेत.

फेसबूकच्या माध्यमातून सापडल्या हरवलेली म्हैस

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील तत्कालीन मंत्र्याच्या म्हैस शोधण्यासाठी पोलिसांना कामाला लावलं होतं. त्यानंतर पोलिसांनीही म्हशी शोधून आणल्या. मात्र, आता एका व्यक्तीने फेसबूकच्या माध्यमातून आपली हरवलेली म्हैस शोधली आहे.

सोशल मीडियाचा असाही फायदा

ऐकालया किंवा वाचायला तुम्हाला थोडसं वेगळं वाटत असेल मात्र, हे १०० टक्के खरं आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात एक पोस्ट व्हायरल झाली होती ज्यामध्ये एका व्यक्तीने फेसबूकच्या माध्यमातून एका व्यक्तीने आपल्या हरवलेल्या म्हशी शोधल्या. हरवलेल्या म्हशी फेसबुकच्या माध्यमातून सापडल्यामुळे हा व्यक्ती आता खूपच आनंदी आहे.

फेसबुक वॉलवर दिसला फोटो

काही दिवसांपूर्वी बंगळुरुतील होसकोटे येथील इस्तुरु गावात राहणाऱ्या एका व्यक्तीची म्हैस बेपत्ता झाली. म्हैस चरता-चरता गावातून दूर निघून गेली. त्यानंतर नारायण स्वामी यांनी आसपासच्या गावांमध्ये आणि परिसरात म्हैस शोधली मात्र काहीच कळलं नाही. त्यानंतर नारायण स्वामी यांना दोन दिवसांनी आपली म्हैस फेसबुक वॉलवर मिळाली.

ही म्हैस कुणाची आहे?

झालं असं की, नारायण स्वामी यांची हरवलेली म्हैस कोद्रहल्ली येथे राहणाऱ्या मोहनने पकडली. त्यानंतर मोहन याने आसपासच्या गावांत विचारणाही केली. पण ही म्हैस कुठल्या शेतकऱ्याची आहे हे कळलचं नाही. त्यानंतर मोहन यांनी म्हशीचा फोटो काढला आणि फेसबूकवर पोस्ट केला. तसेच फोटो कॅप्शनमध्ये म्हटलं 'ही म्हैस कुणाची आहे? शेअर करा आणि या म्हशीला तिच्या मालकापर्यंत पोहचवा'.

हरवलेली म्हैस सापडली

ही पोस्ट अनेकांनी फेसबुकवर शेअर केली. अशाच प्रकारे ही पोस्ट नारायण स्वामी यांच्यापर्यंतही पोहोचली. नारायण स्वामी यांनी ही पोस्ट पाहिली आणि मग त्यांनी मोहन यांच्याशी संपर्क करत आपली हरवलेली म्हैस परत आणली.