भारतातील सर्वात महागडा स्टॉक!अवघ्या 3-4 रुपयांचा शेअर्सची किंमत इतकी वाढली घ्याल 2 आयफोन 16 प्रो

Most Expensive Stock:  शेअर बाजारामध्ये मंगळवारचा दिवस कोणी विसरु शकणार नाही. कारण या दिवशी असंच काहीसं झालंय. 

Pravin Dabholkar | Updated: Oct 30, 2024, 01:29 PM IST
भारतातील सर्वात महागडा स्टॉक!अवघ्या 3-4 रुपयांचा शेअर्सची किंमत इतकी वाढली घ्याल 2 आयफोन 16 प्रो title=
एलसिड इन्व्हेस्टमेंट

Most Expensive Stock: शेअर बाजारामध्ये मंगळवारचा दिवस कोणी विसरु शकणार नाही. कारण या दिवशी असंच काहीसं झालंय. अशी एक कंपनी जिच्या शेअर्सची किंमत 3 ते 4 रुपये ट्रेंड करत होती. यामध्ये एका दिवसात 66, 92, 535 टक्के इतकी उसळी आली आहे. या शेअरची किमत 2 लाख 36 हजार 250 रुपयांवर पोहोचली. Elcid Investments असे या शेअर्सचे नाव आहे. भारतातील महागडा शेअर्स एमआरएफसा देखील Elcid Investments ने मागे टाकले आहे. एका दिवसात या शेअरची किंमत 3 ते 4 रुपयांवरुन 2.35 लाखांवर पोहोचली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील त्यांना काही महिन्याच्या आतच 670 कोटी रुपये मिळाले. हा शेअर सेकेंडरी मार्केटमध्ये ट्रेडींगसाठी उपलब्ध नव्हता. याची सध्याची किंमत 1 लाख 19 हजार 900 रुपये इतकी आहे. 

Elcid Investments मध्ये गुंतवणूक का वाढली? 

Elcid Investments स्टॉकमध्ये BSE आणि NSE च्या प्राइज डिस्कव्हरी ऑक्शन दरम्यान वाढ झाली. हा लिलाव गुंतवणूक होल्डिंग कंपन्यांच्या किंमती शोधण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. बीएसईने 21 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. या माध्यमातून निवडक गुंतवणूक होल्डिंग कंपन्यांना पुन्हा सूचीबद्ध केले जाणार होते. जून 2024 मध्ये SEBI कडून गुंतवणूक कंपनी आणि गुंतवणूकदार होल्डिंग कंपनीच्या प्राइस डिस्कव्हरीसाठी नोटिफिकेशन आले होते. 

एलसिड इन्व्हेस्टमेंट्समधील शेअर्सचे मूल्य कमी होते. पण त्याची बुक वॅल्यू जास्त होती. या संदर्भात सेबीने होल्डिंग कंपन्यांचे सध्याचे बाजार मूल्य आणि बुकींग वॅल्यू यांच्यातील तफावत कमी करण्यासाठी बाजारातून विशेष लिलाव करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

एलसिड इन्व्हेस्टमेंटचे मार्केट कॅप फक्त 4,725 कोटी रुपये आहे. असे असताना आता तो सर्वात महाग शेअर बनला आहे. सध्या एमआरएफ 1 लाख 23 हजार 027 रुपये प्रति शेअरवर ट्रेडिंग करतोय. यावरुन तुम्ही एलसिड इन्व्हेस्टमेंटला मिळालेल्या प्रतिसादाचा अंदाज घेऊ शकता. 

एलसिड इन्व्हेस्टमेंटची गुंतवणूक

एलसिड इन्व्हेस्टमेंट कंपनीची एकूण 11,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. एशियन पँट्समध्ये त्याची 2.83% भागीदारी आहे. ज्याचे मूल्य 8500 कोटी रुपये आहे. कंपनीची बूक वॅल्यू 4.58 लाख/शेअर आहे. कंपनी कोणत्याही ऑपरेशनल व्यवहारात नाही.