मुंबई : चहा प्रेमींबद्दल आपण बरंच ऐकलं आहे, परंतु कॉफी प्रेमींची देखील कमी नाही. असे अनेक लोक आहेत. ज्यांचं कॉफीवरती अफाट प्रेम आहे. तर काही लोक आवड म्हणून किंवा वेगळी चव म्हणून कॉफी पितात. गरमागरम वाफाळलेली कॉफी प्यायल्यावर मन प्रसन्न होते. संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतल्यावर कॉफी प्यायल्याने दिवसभराचा थकवा दूर होतो. बऱ्याचदा तर कॉफीच्या वासानेच दिवसभराचा थकवा दुर होतो.
सध्या अशाच एका फिल्टर कॉफीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. कॉफीच्या या फोटोने जगभरातील लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. आता तुम्ही विचार करत असाल की, या फोटोत असे काय आहे, ज्याने लोकांना विचार करायला लावला आहे.
हा फोटो जो आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. तो काळजीपूर्वक पहा. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला कॉफी प्यावीशी वाटेल. चित्र इतकं जबरदस्त आहे की, ती कॉफी तेथून उचलून प्यावीशी वाटेल.
हा फोटो पाहिल्यानंतर तुमच्या मनात काय विचार येतो? तुम्ही विचार करत असाल की, फोटोग्राफरने एक अतिशय जीवंत चित्र टिपले आहे. परंतु इथेच तुम्ही फसला आहात.
कारण खरेतर हे कॅमेऱ्याने काढलेला फोटो नसून ते एक चित्र आहे. जे जिवंत चित्रासारखे दिसते. चेन्नईतील एका कलाकाराने या चित्राचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.
फिल्टर कॉफीच्या कपचे हा फोटो पाहून तुम्हाला ते चित्र आहे, असं तुम्हाला अजिबात वाटणार नाही. तुम्हाला वाटेल की हे कॅमेऱ्याने घेतलेले खऱ्या कॉफीचा फोटो आहे.
या कलाकाराने अतिशय सुंदर चित्र काढलं आहे, जे हुबेहुब खऱ्या कॉफी सारखे वाटत आहे. जे अगदी मूळ फिल्टर कॉफीसारखे दिसते. हा फोटो पाहून जगभरातील लोक गोंधळले आहेत. या अप्रतिम स्केचला आतापर्यंत 50 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
i painted filter coffee! pic.twitter.com/tmvMLoKVcb
— V (@VforVendakka_) April 21, 2022
या व्हिडीओमध्ये या फॉफीचं स्केच कसं काढलं गेलं, हे दिसत आहे, ज्यामुळे तुम्हाला ते चित्र बनवण्याची संपूर्ण प्रोसेस दिसेल. कलाकाराने एक टाइमलॅप व्हिडीओ शेअर केला आहे.