शिमला : केरळमध्ये 'निपाह' व्हायरसमुळे दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या जीवघेण्या व्हायरसमुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर सुमारे 15 जण अत्यावस्त स्थितीत आहेत. जागतिक आरोग्य संस्थेने (WHO)निपाहच्या धोक्याबाबत माहिती दिली आहे. या व्हायरसचा धोका जाणून घेता सरकारने केरळ वगळता जम्मू काश्मिर, गोवा, राजस्थान, गुजरात, तेलंगणा या राज्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. मात्र अचानक हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यामध्ये एका शाळेच्या आवारात 18 वटवाघुळं मृत अवस्थेमध्ये सापडल्याने भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. 48 तासात जीवघेणा ठरतोय 'निपाह' व्हायरस
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, हिमाचल प्रदेशातील लोकंही निपाह व्हायरसच्या धोक्यामुळे भयभीत झाली आहेत. अचानक वटवाघुळ मृत अवस्थेमध्ये सापडल्याने त्यांचे सॅम्पल लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. टेस्ट रिपोर्टनंतर लवकरच याबद्दल माहिती मिळेल. वटवाघुळांची सॅम्पल्स नेशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरल डिजीज पुणे आणि जालंधर येथे पाठवण्यात आली आहेत. Nipah Virus चा धोका ! सध्या केरळ ट्रीप करणं खरंच सुरक्षित आहे का?
'निपाह' व्हायरसची दहशत सध्या देशभर पसरली आहे. वन विभागाचे डीसी ललित जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत वटवाघुळांमधून 'निपाह' व्हायरसचा प्रसार होणं कठीण आहे. उन्हाळ्यामुळे वटवाघुळं मेली असावीत असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मेलेल्या वटवाघुळांचे सॅम्पल गोळा केल्यानंतर त्यांना पुरण्यात आले आहे. प्रयोगशाळेतून निकाल आल्यानंतर या प्रकरणाबाबतचा खुलासा होणार आहे. 'निपाह' व्हायरसची दहशत पसरवाणारी करोडो वटवाघुळं 'या' गावात फळं खातात