मुंबई : फाशीची शिक्षा झालेले निर्भयाचे चारही आरोपींना तिहार कारागृहातील क्रमांक तीनमद्ये ठेवण्यात आलं आहे. जसे जसे फाशीचे दिवस जवळ येत आहेत तशी या आरोपींच्या मनातील भीती वाढत आहे. यामध्ये आरोपी कोणता चुकीचा निर्णय घेऊ नये म्हणून त्यांना 24 तास कडक बंदोबस्तात ठेवलं जातं. या आरोपींच्या सुरक्षेसाठी तामिळनाडूच्या पोलिसांना तैनात करण्यात आलं आहे.
दिल्लीतील निर्भया प्रकरणाला तामिळनाडू पोलिसांची सुरक्षा का देण्यात आली असा सवाल केला जात आहे? आरोपींच्या फाशीचा दिवस जसजसा जवळ येत आहे तसतशी सुरक्षा वाढवण्यात येत आहे. कारण या दिवसांत आरोपींकडून कोणतीही चूक होऊ नये याची खबरदारी घेतली जाते.
अशात जर आरोपी आणि पोलीस एकच भाषा बोलत असतील तर त्यांची चर्चा होते. ती होऊ नये याकरता तामिळनाडू पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या पोलिसांना हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा येत नसल्यामुळे आरोपींचा संवाद होत नाही. हे सर्वात मोठे कारण आहे ज्यामुळे तामिळनाडू पोलिसांना तैनात करण्यात आलं आहे.
जेव्हा पोलीस आणि आरोपी एकमेकांची भाषा समजत नाही. तेव्हा ते एकमेकांशी संवाद साधत नाहीत. बोलणार नाहीत मग त्यांच्यात काही संबंधच राहणार नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हे जवान आरोपींना सुरक्षा देवू शकतात.
निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना १ फेब्रुवारीला फासावर लटकवण्यात येणार आहे. त्यादृष्टीने तिहार तुरुंगात सर्व तयारीही पूर्ण झाली आहे. मात्र, दोषींच्या वकिलांकडून कायदेशीर पळवाटांचा अवलंब करून फाशीची शिक्षा पुढे ढकलण्याचा प्रयत्न होत आहे. आतादेखील विनय शर्मा याच्या वकिलांकडून तसा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.