Petrol-Diesel Rate Today: आधीच महागाईत जनता होरपळत असताना आजपासून नव्या नियमांमुळे त्यात भर पडली आहे. महागाईत पुन्हा लोकांच्या खिशाला फटका बसणार आहे. आज 1 जुलै 2023 पासून सरकारने अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. भारतात, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम सारख्या तेल विपणन कंपन्या (OMCs) पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवतात. हे दररोज केले जाते आणि जगभरातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार दर निर्धारित केले जातात. मात्र, पेट्रोल आणि डिझेल दरात कोणाताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्ली, मुंबई, बेंगळुरु, गुरुग्राम आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांसह 1 जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम राहिले आहेत.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर बदलत असतात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. मात्र, जून महिन्यात दरवाढीनंतर जुलै महिन्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नागपूर पेट्रोल 106.04 रुपये तर डिझेल 92.59 रुपये लीटर आहे. नांदेड पेट्रोल 107.89 रुपये तर डिझेल 94.38 रुपये आहे. तर नाशिक शहरात 106.76 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये आहे. ठाणे - पेट्रोल 106.01रुपये तर डिझेल 92.50 रुपये, पुणे - पेट्रोल 106.17 रुपये तर डिझेल 92.68 रुपये, कोल्हापूर - पेट्रोल 106.56 रुपये तर डिझेल 93.09 रुपये, रायगड - पेट्रोल 105.79 रुपये तर डिझेल 92.39 रुपये, रत्नागिरी - पेट्रोल 107.43 रुपये तर डिझेल 93.87 रुपये, सांगली - पेट्रोल 106.51 रुपये तर डिझेल 93.05 रुपये, सातारा - पेट्रोल 106.99 रुपये तर डिझेल 93.48 रुपये, औरंगाबाद - पेट्रोल108.00 रुपये तर डिझेल 95.96 रुपये असा दर आहे.
शहर | पेट्रोल (प्रति लिटर) | डिझेल (प्रति लिटर) |
मुंबई | 106.31 रुपये | 94.27 रुपये |
चंदीगड | 96.20 रुपये | 84.26 रुपये |
चेन्नई | 102.63 रुपये | 94.24 रुपये |
गुरुग्राम | 97.18 रुपये | 90.05 रुपये |
कोलकाता | 106.03 रुपये | 92.76 रुपये |
लखनऊ | 96.57 रुपये | 89.76 रुपये |
बंगळुरु | 101.94 रुपये | 87.89 रुपये |
नवी दिल्ली | 96.72 रुपये | 89.62 रुपये |
नोएडा | 96.79 रुपये | 89.96 रुपये |
तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> 9224992249 या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.