Auto Ticket Upgradation Rules: दिल्लीसह भारतातील अनेक भागात कडाक्याची थंडी पडली आहे. अशात जर तुम्ही ट्रेनच्या स्लीपर कोचमधून प्रवास करत असाल तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकता. पण तुम्हाला माहितीये का स्लीपर कोचच्या ट्रेन तिकीट बुक केल्यानंतरही तुम्ही AC कोचमध्ये प्रवास करु शकतात. पण ही सुविधा सर्व प्रवाशांसाठी नाहीये. IRCTC त्याच्या ग्राहकांसाठी ही खास सुविधा आणली आहे. आयआरसीटीसी ऑटो अपग्रेडेशन स्कीम सुरू केली आहे. काय आहे ही स्कीम जाणून घेऊया.
ट्रेनचे अपर क्लास कोच AC1, AC2 च्या तिकीटांचे दर जास्त असल्याने अनेकदा या कोच महागड्या दरांमुळे अनेकदा रिकामे राहतात. अशा परिस्थितीत, हे बर्थ रिकामे राहिल्याने रेल्वेला मोठे नुकसान सहन करावे लागले. बऱ्याच विचारविनिमयानंतर, रेल्वेने ही ऑटो अपग्रेड योजना सुरू केली, ज्या अंतर्गत जर वरच्या श्रेणीची बर्थ रिकामी असेल तर एका खालच्या श्रेणीत तिकीट बुक केलेल्या प्रवाशाला त्या श्रेणीत अपग्रेड केले जाते.
ही योजना समजून घेऊया, समजा ट्रेनच्या फर्स्ट एसीमध्ये 4 सीट रिकाम्या असतील आणि सेंकड एसीमध्ये 2 सीट रिकाम्या असतील तर सेंकड एसीचे तिकीट असणारे ग्राहक तिकीट अपग्रेडकरुन फर्स्ट एसीमध्ये बदलून घेऊ शकता. तसंच, थर्ड एसीमध्ये काही सीट रिकाम्या असतील तर ज्यामध्ये वेटिंग लिस्टमधील प्रवाशांना थर्ड एसीमध्ये जागा मिळेल. अशा प्रकारे, ट्रेनच्या कोणत्याही कोचची जागा रिकामी राहणार नाही.
तिकीट बुक करताना, आयआरसीटीसी तुम्हाला एका पर्याय विचारते की तुम्ही तुमच्या तिकिटावर ऑटो अपग्रेडसाठी तयार आहात का. जर तुम्ही हो हा पर्याय निवडला तर तुमचे तिकीट अपग्रेड केले जाईल आणि जर तुम्ही नाही हा पर्याय निवडला तर ते अपग्रेड केले जाणार नाही. जर प्रवाशाने कोणताही पर्याय निवडला नाही, तर तो हो मानला जाईल.
जर प्रवाशाचे तिकीट अपग्रेड केले तर त्याच्या पीएनआरमध्ये कोणताही बदल होत नाही. तो त्याच्या प्रवासाशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी त्याचा मूळ पीएनआर वापरेल. त्याच वेळी, जर त्याने तिकीट अपग्रेड केल्यानंतर त्याचे तिकीट रद्द केले तर त्याला त्याच्या मूळ तिकिटानुसार परतावा मिळेल.