Raymond's Chairman: रेमंडचे चेअरमन आणि एमडी गौतम सिंघानिया हे नेहमीच त्यांच्या लाइफस्टाइलमुळे चर्चेत असतात. त्याच्याकडे जगातील सर्वोत्तम कारचे कलेक्शन आहे. यापैकी एक म्हणजे लॅम्बॉर्घिनी रेव्हुल्टो. ही कार गौतम सिंघानिया आणि लॅम्बॉर्घिनी यांच्यातील भांडणाचे कारण बनले आहे. रेमंडचे चेअरमन गौतम सिंघानिया यांनी नक्की काय घडलं याबद्दल पोस्ट केली आहे.
गौतम सिंघानिया यांनी रविवारी लॅम्बोर्गिनी इंडियाचे शरद अग्रवाल आणि आशिया प्रमुख फ्रान्सिस्को स्कार्डोनी यांना टॅग केले आणि सोशल मीडियावर लिहले की, 'तुम्हा लोकांच्या अहंकाराचे मला आश्चर्य वाटते. मला कारमध्ये (लॅम्बॉर्घिनी) कोणत्या अडचणी येत आहेत हे जाणून घेण्यासाठी आजपर्यंत कोणीही माझ्याशी संपर्क साधला नाही. कार खरेदी केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत समस्या दिसू लागल्या आहेत.' इलेक्ट्रिक समस्येमुळे त्याची गाडी बंद झाली त्यामुळे ते मुंबईच्या रस्त्यावर उभे राहिले होते. नवीन कारमध्ये अशा समस्या आश्चर्यकारक आहेत. या मुद्द्यावर लॅम्बॉर्घिनीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. या कारच्या सर्व्हिसिंग सर्व्हिसमुळे गौतम सिंघानिया नाराज असून सोशल मीडियावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
I'm shocked at the arrogance of India Head @Agarwal_sharad and Asia Head Francesco Scardaoni. Not one has reached out to even check what the customer issues are.@lamborghini #StephanWinkelmann#Lamborghini #LamborghiniIndia #Revuelto #LuxuryCars #Supercars #ExoticCars…
— Gautam Singhania (@SinghaniaGautam) October 27, 2024
रेमंडचे चेअरमन आणि एमडी गौतम सिंघानिया यांच्याकडे आलिशान गाड्यांचा संग्रह आहे. त्याच्याकडे Ferrari 458, Audi Q7, LP570 Superleggera, Nissan Skyline GT-R आणि Lamborghini Gallardo सारख्या प्रीमियम कार्सचा संग्रह आहे. एकदा ते फॉर्म्युला वन कार चालवण्यासाठी फ्रान्सलाही गेला होते.