नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या युजर्सला एक मोठं गिफ्ट दिलं आहे. ज्या ग्राहकांना डेबिट कार्ड वापरापासून भीती वाटते अशा ग्राहकांसाठी ही खूपच दिलासा देणारी बातमी आहे. एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी असं ATM कार्ड काढलं आहे जे तुम्ही स्वत: कंट्रोल करु शकाल. आपल्या ग्राहकांना बँकेतर्फे हे ATM कार्ड देण्यात येत आहे. पाहूयात काय आहे हे ATM कार्ड...
SBI क्विक मध्ये ATM कार्डसाठी काही खास सुविधा दिल्या आहेत. हे अॅप तुम्हाला ATM कार्ड ब्लॉक करणं, ऑन किंवा ऑफ करणं आणि ATM पिन जनरेट करण्याची सुविधा उपलब्ध करुन देतं.
SBI क्विक अॅपच्या माध्यमातुन युजर्स आपल्या ATM कार्डची संपूर्ण सुरक्षा स्मार्टफोनवरुन करु शकणार आहेत. मात्र, यासाठी ग्राहकांना आपल्या मोबाईल फोनमध्ये हे अॅप डाऊनलोड करावं लागणार आहे. तसेच आपला मोबाईल नंबरही बँकेकडे रजिस्टर्ड करावा लागणार आहे.
सर्वातआधी हे अॅप सुरु करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. यासाठी तुम्हाला अॅपच्या रजिस्ट्रेशन फिचरमध्ये जाऊन ज्या नंबरवर अॅप डाऊनलोड केलं आहे तो नंबर एंटर करायचा. त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.
जर तुमचं ATM कार्ड हरवलं किंवा चोरी झालं तर ते ब्लॉक करणं गरजेतं आहे. हे काम तुम्ही आपल्या मोबाईल अॅपमधून एका क्लिकवर करु शकणार आहात. मोबाईल अॅपमधील एटीएम कम डेबिट कार्डच्या फिचरमध्ये जाव आणि एटीएम कार्ड ब्लॉकिंग सिलेक्ट करा. त्यानंतर तुमच्या कार्डचे शेवटचे ४ डिजिट एंटर करुन कंटिन्यू सिलेक्ट करा. या सेवेसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चार्जेस द्यावे लागणार नाहीत. जर SMS च्या माध्यमातून तुम्हाला एटीएम कार्ड ब्लॉक करायचं असेल तर BLOCK space डेबिट कार्डचे शेवटचे ४ डिजिट टाईप करुन ५६७६७६ या क्रमांकावर SMS करा.
एसबीआय क्विक अॅपच्या माध्यमातून युजर्स आपल्या एटीएम कार्डला कुठल्याही एटीएम मशीन, पीओएस मशीन, ई-कॉमर्स, इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक वापरासाठी स्विच ऑन किंवा ऑफ करु शकता. यासाठी तुमच्या अॅपच्या एटीएम कम डेबिट कार्ड फिचरमध्ये जा आणि कार्डचे शेवटचे ४ डिजिट एंटर करुन एटीएम स्विच ऑन/ऑफ वर क्लिक करा.
जर तुम्ही मेसेजच्या माध्यमातून ऑन किंवा ऑफ करु इच्छिता तर तुम्हाला ०९२२३५८८८८८ या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल.
ATM ट्रान्झॅक्शन स्विच ऑनसाठी - SWONATM space कार्डचे शेवटचे ४ डिजिट
ATM ट्रान्झॅक्शन स्विच ऑफसाठी - SWOFFATM space कार्डचे शेवटचे ४ डिजिट
POS स्विच ऑन करण्यासाठी - SWONPOS space कार्डचे शेवटचे ४ डिजिट
स्विच ऑफसाठी - SWOFFPOS space कार्डचे शेवटचे ४ डिजिट