IAS Couple Love Story : आयएएस आणि आयपीएसचे अनेक किस्से आतापर्यंत आपण ऐकले असतील. त्यापैकी काही खास असतात. सृष्टी देशमुख आणि नागार्जुन बी. गोंडा यांची कहाणी प्रेरणादायी आणि हृदयापर्यंत पोहोचणारी आहे. आजकाल सोशल मीडियावर या आयएएस दाम्पत्याची जोरदार चर्चा आहे. सृष्टी जयंत देशमुख इंजिनीअरिंग करत असताना अशी जिद्द बांधली की वयाच्या २३ व्या वर्षी आयएएस अधिकारी बनली. या वर्षी सृष्टी देशमुख यांनी एप्रिल 2022 रोजी आयएएस अधिकारी नागार्जुन बी. गौडा यांच्याशी लग्न केले.
सृष्टी देशमुख आणि नागार्जुन बी. गोंडा यांचा प्रेमविवाह आहे. हे जोडपे सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. त्यांचे बहुतेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात.
सृष्टी देशमुख आणि नागार्जुन बी. गोंडा दोघेही 2018 च्या बॅचचे अधिकारी आहेत. सृष्टी ही मुळची भोपाळची, तर नागार्जुन बी गौडा मूळचे कर्नाटकचे. मसुरीमध्ये प्रशिक्षणादरम्यान दोघांची भेट झाली. तिथूनच त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली आणि मग ही मालिका लग्नापर्यंत पोहोचली. सृष्टी एमपी कॅडर आणि नागार्जुन बी गौडा यांना कर्नाटक कॅडर देण्यात आले. नंतर नागार्जुनही कॅडर बदलीनंतर मध्यप्रदेशात गेले. दोघांनीही एमपीमध्ये आल्यानंतरच थाटामाटात लग्न केले.