Insta Reels : तरूणांमध्ये इन्स्टा रिल्सची (Insta Reels) खुप क्रेझ आहे. अनेक तरूण-तरूणी इन्स्टा रिल्स बनवून सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करत असतात. या रिल्सद्वारे ते नागरीकांचे मनोरंजन करत असतात.मात्र अशाप्रकारची रिल्स बनवण काही तरूणांना चांगलेच महागात पडले आहे. तरूणांच्या कुटूंबियांवर शोककळा पसरली आहे. दरम्यान नेमकं या घटनेत काय झालंय, हे जाणून घेऊयात.
काही तरूण एकत्र मिळून इस्टाग्राम (Instagram) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी इन्स्टा रिल्स (Insta Reels) बनवत होते. हे तरूण रेल्वे रूळावर उभं राहून हे रिल्स बनवत होते. यावेळी मागून येणाऱ्या एका एक्सप्रेसने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये दोन मुलांचा आणि एका मुलीचा समावेश होता. या घटनेने त्यांच्या कुटूंबियांवर दुखाचा ड़ोंगर कोसळलाय.
गाझियाबादमध्ये ही दुदैवी घटना घडलीय. या घटनेत रेल्वे रूळावर रिल्स (Insta Reels) बनवायला गेलेल्या तरूणांना पद्मावत एक्स्प्रेसने धडक दिली होती. मसुरी भागातील डासना क्रॉसिंग जवळ ही घटना घडलीय. या घटनेत तीन जणांना आपला जीव गमवावा लागला होता. पोलिसांनी तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
गाझियाबादच्या डीसीपीच्या म्हणण्यानुसार, रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मसुरी पोलिस स्टेशनमध्ये (Masoori Police Station) 3 जणांना ट्रेनने धडक दिल्याची माहिती मिळाली होती. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा 3 लोकांचे मृतदेह आढळले. ज्यामध्ये दोन मुले आणि एक मुलगी होती.हे तिघेही तिथे व्हिडिओ बनवत होते आणि त्यांना ट्रेन दिसत नव्हती, त्यामुळे ट्रेनला धडकून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. सध्या या मृतांची ओळख पटवली जात आहे.
दरम्यान तरुणांमध्ये रील्स (Insta Reels) बनवण्याचा प्रचंड उत्साह आहे. त्यामुळे अनेकवेळा तरुणाई उत्साहाच्या भरात जोखीम उचलते. त्यामुळे अनेक तरुणांना आपला जीव देखील गमवावा लागतो. त्यामुळे तरूणांनी अशा प्रकारचे स्टंट करून रिल्स बनवू नये असे आवाहन आम्ही यानिमित्त करत आहोत.