Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024-25 वर्षासाठी संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात पायाभूत सुविधेवरही भर देण्यात आला आहे. पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारच्या तिजोरीतून 11.11 लाख कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. तसंच, पर्यटनाला चालना मिळावी यासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या घोषणाही करण्यात आल्या आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पायभुत सुविधांसाठीच्या विधीत 11 टक्के वाढ केली आहे. 2024-25 वर्षासाठी 11.11 लाख कोटींची घोषणा केली आहे. या निधीचा वापर देशांतर्गंत पर्यटनाला चालना देण्यासाठी केला जाऊ शकतो. लक्षद्विपसह भारतातील सर्व किनारी भागांतील कनेक्टिव्हिटी, टुरिझम वाढवण्यासाठी इन्फ्रा आणि सुविधांनी युक्त असलेल्या प्रकल्पांची सुरुवात होईल.
निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे की, बायोफ्यूलसाठी विशेष योजना आणण्यात येणार आहे. सार्वजनिक वाहतुकींसाठी ई-वाहने उपलब्ध करण्यात येतील. तसंच, रेल्वे-समुद्र मार्ग जोडण्यावर अधिक भर दिला जाईल. पर्यटन स्थळांच्या विकासावर तरतूद करण्यात येणार आहे.
पर्यटन स्थळांचा विकास होतोय. लक्षद्वीपमध्ये नव्या योजना सुरू करण्यात येणार आहेत. राज्यांना व्याजमुक्त कर्ज दिले जाईल. टियर 2 आणि टियर-3 शहरांना हवाई मार्गाशी जोडले जाईल. तसंच, पर्यटन क्षेत्रांत परदेशी गुंतवणुकीला चालना देण्यात येईल. दरम्यान, जुलैमध्ये पूर्ण अर्थसंकल्प जाहीर केला जाणार. त्यात विकसित भारताचा रोडमॅप सादर केला जाणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 11 टक्के अधिक खर्च केला जाणार आहे.
The outlay for infrastructure has been increased to Rs 11.11 lakh crores in FY25, says FM Sitharaman. pic.twitter.com/DKZkyDY3kS
— ANI (@ANI) February 1, 2024