Jalaun News : इन्स्टाग्रामवर चिता, अंतिमयात्रा सारखे स्टेट्स ठेवत दोन जीवलगन मित्रांना आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दोघांनी विषारी पदार्थ खात आपलं आयुष्य संपवलं. मृत्यूपूर्वी या दोन्ही मित्रांनी ओशोंचं प्रवचन (Osho sermon) ऐकलं होतं. इतकंच नाही तर त्यांनी इन्स्टाग्रामवर मृत्यूचं अंतिम सत्य आहे असंही स्टेटस ठेवलं होतं. तरुण मुलांच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिले.
काय आहे नेमकी घटना?
ही संपूर्ण घटना उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) कालपी इथली आहे. इथल्या एका सुनसान जागेवर अमन वर्मा आणि बालेंद्र पाल नावाच्या जिवलग मित्रांनी विषारी पदार्थ खाला. यानंतर बालेंद्र पाल याचा जागीच मृत्यू झाला. तर अमनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.
पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ तपास सुरु केला. अमन आणि बालेंद्र लहानपणापासून जीवलग मित्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अमन हा मेडिकल स्टोरमध्ये कामाला होत आणि त्याचं लग्न झालं होतं. तर बालेंद्र अविवाहीत होता आणि अमला भेटण्यासाठी तो त्याच्या मेडिकल दुकानावर जायचा. दोघंही वेळ मिळेल तेव्हा ओशोंचं प्रवचन ऐकत असल्याची माहितीही पोलिसांनी मिळालीय. ओशोंच्या विचारांवर ते प्रभावित होते. आत्महत्या करण्यापूर्वी अमन आणि बालेंद्रने आपापल्या मोबाईलवर तीन स्टेट्स ठेवले होते.
मोबाईलच्या स्टेट्सवर त्यांनी जळती चिता, अंतिम यात्रा आणि ओशोंचा फोटो ठेवला होता. फोटोखाली त्यांनी मृत्यूचं अंतिम सत्य आहे (Death is Only Truth) असं लिहिलं होतं. अमन आणि बालेंद्रच्या मृत्यून दोघांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अमन आणि बालेंद्रच्या मृत्यूचं नेमकं कारण काय याचा आता पोलीस शोध घेत आहेत.
कुटुंबातील 8 जणांची हत्या
दुसऱ्या एका घटनेत मध्यप्रदेशमधल्या छिंदवाडा जिल्ह्यात एका व्यक्तीने आठ जणांची कुऱ्हाडीने हल्ला करत निर्घृण हत्या केली. आपल्या कुटुंबातील आठ जणांची हत्या केल्यानंतर आरोपीने गळफास घेत आत्महत्या केली. हत्या करणारा हा कुटुंबातील प्रमुख होता आणि गेल्या काही दिवसांपासून त्याची मानसिक स्थिती ठिक नव्हती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतांमध्ये पत्नी, मुलं, भाऊ आणि वहिणीचा समावेश आहे. या घटनेत एक लहान मुलगा आश्चर्यकारकरित्या बचावला असून त्याच्यावर रुग्णालयता उपचार सुरु आहेत.