Baby Names on Hartalika : हिंदू धर्मात हरतालिकेच्या व्रताला भरपूर महत्त्व आहे. गणेश चतुर्थीच्या एक दिवस अगोदर हा उपवास असतो. हा उपवास लग्नापूर्वी कुमारीका धरतात. चांगला नवरा मिळावा या उद्देशाने हा उपवास केला जातो.
पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने शंकरदेवाला आपला पती बनवण्यासाठी हा उपवास केला. निर्जली उपवास असल्याने हा उपवास अतिशय कडक उपवास समजला जातो.जर याच दिवशी तुमच्या घरी लेकीचा जन्म झाला तर तिला देवी पार्वतीवरुन नाव द्या. ज्यामुळे कायम तिच्यावर देवी पार्वतीचा आणि हरतालिकेचा आशिर्वाद राहील.