Vaginal Health : बहुतेक महिलांना पांढऱ्या पाण्याने किंवा पांढऱ्या स्रावाचा त्रास होतो. हा सामान्य असला तरी त्याकडे महिला सर्रास दुर्लक्ष करतात. ही समस्या कोणत्याही वयोगटातील महिलांना होऊ शकतो. पण सहसा मासिक पाळी किंवा गर्भधारणेदरम्यान ही समस्या जास्त प्रमाणात वाढते. यामागील चिंतेत कारण नसलं तरी त्यामागे अनेक कारणं असून शकतात त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकतो. पांढर पाणी याला वैद्यकीय भाषेत ल्युकोरिया असं म्हटले जाते. (White Discharge reasons in marathi vaginal health causes symptoms home remedies in marathi )
नाजूक भागांची व्यवस्थित स्वच्छता न करणं
रक्ताची कमतरता
चुकीच्या पद्धतीनं शारीरिक संबंध ठेवणं
जास्त उपवास करणं
तिखट, मसालेदार पदार्थांचे अतिसेवन
योनीमध्ये बॅक्टिरिया असणं
सतत गर्भपात होणं
चांगल्या बॅक्टेरियांची कमरता
शरीरातील पीएच लेव्हलमध्ये बिघाड
रोगप्रतिराकशक्ती कमजोर असणं
योनिमध्ये फंगल इन्फेक्शन
वजानल हेल्थबाबत निष्काळजीपणा
त्याशिवाय महिलांच्या शरीरातील हार्मोनल असंतुलन हे जास्त पांढरे स्राव होण्याचे मुख्य कारण असू शकतं.
काहीवेळा, गर्भनिरोधक गोळ्या किंवा इतर औषधांच्या सेवनाने देखील पांढरा स्त्राव वाढू शकतो. या औषधांमुळे हार्मोनल बदल होऊ शकतात, ज्यामुळे ही समस्या उद्भवू शकते.
असंतुलित आहार, कमी पाणी पिणे, मानसिक ताणतणाव यामुळेही जास्त प्रमाणात पांढरा स्राव होतो.
- गर्भधारणेदरम्यान हार्मोनल बदलांमुळे पांढरा पाणचट स्त्राव देखील वाढतो.
अशक्तपणा
हात, पायांमधील वेदना
शरीर जड झाल्याप्रमाणे वाटणं
चिडचिड होणं
चक्कर येणं
भूक न लागणं
व्यवस्थित पोट साफ न होणं
सतत लघवी बाहेर येणं
पोट जड वाटणं
योनी मार्गात खाज येणं
सफरचंद सायडर व्हिनेगर
ऍपल सायडर व्हिनेगर नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्मांनी समृद्ध आहे. एक ग्लास पाण्यात एक चमचा ऍपल सायडर व्हिनेगर मिसळून दिवसातून दोनदा प्यायल्याने शरीरातील विषारीपणा कमी होतो. यामुळे संसर्ग टाळण्यास मदत होते.
तुळशीची पाने
तुळशीच्या पानांमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. तुळशीची काही पाने उकळवून त्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील संसर्ग दूर होण्यास मदत होते.
योग
मानसिक ताण कमी करण्यासाठी योगा आणि ध्यानाचा सराव करा. हे हार्मोनल असंतुलन नियंत्रित करण्यात मदत करते आणि शरीराला मानसिक शांती प्रदान करते, ज्यामुळे पांढरा स्त्राव कमी होतो.
गरम पाण्यात मीठ
कोमट पाण्यात एक चमचा मीठ मिसळून योनी धुतल्याने संसर्ग टाळण्यास मदत होते. हे एक नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल एजंट म्हणून कार्य करते आणि पांढरे स्त्राव नियंत्रित करण्यात मदत करू शकते.
प्रोबायोटिक्सचे सेवन
दह्यासारखे प्रोबायोटिक्स शरीरातील चांगल्या बॅक्टेरियाचे संतुलन राखण्यास मदत करतात. हे योनीमध्ये बॅक्टेरियाचे असंतुलन रोखण्यास मदत करते आणि पांढर्या स्त्रावच्या समस्येवर नियंत्रण ठेवते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)