Potholes On Kalyan Road : कल्याणमध्ये एक रिक्षाचालक रिक्षात प्रवासी भरण्याऐवजी, चक्क डांबरमिश्रित खडी भरु प्रवास करत आहे. ही रिक्षा तो शहरभर फुरवत रस्त्यातवरचे खड्डे बुजवत आहे. या रिक्षावाल्याची कल्याणमध्ये जोरदार चर्चा आहे. त्याच्या या उपक्रमाचचे कौतुक देखील केले जात आहे. कल्याण डोंबिवलीकर सध्या खड्ड्यांच्या समस्येमुळे त्रस्त या खड्ड्यांमुले मोठ्या प्रमाणात अपघात होऊन अनेक लोकांचा बळी देखील जात आहे.
राजमणी यादव असं या रिक्षाचालकाचं नाव आहे. डांबरीकरण सुरू आहे तिथे जाऊन डांबरमिश्रीत खडी यादव मागून घेतात. आणि ती आपल्या रिक्षात भरून, कल्याणमधले खड्डे ते बुजवतात. गेल्या 8 वर्षांपासून ते हे काम करत आहेत.
रस्त्यावरील खड्डे बुजवणाऱ्या या रिक्षा चालकाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ते कल्याणच्या सहजानंद चौक परिसरात असलेला खड्डा बुजवताना दिसत आहेत. भर रस्त्ययात रिक्षा थांबवून खड्डा बुजवत आहेत. राजमणी यांच्या या कामाचं नागरिकांकडून कौतुक देखील होत आहे.
डोंबिवलीत शिवसेनेच्या माजी नगरसेवकानं अनोखं आंदोलन केले होते. खड्डेमय रस्त्याच्या ठिकाणी स्वर्गाचे प्रवेशद्वार असा फलक लावून कल्याण डोंबिवली महापालिकेचं लक्ष या समस्येकडे वळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. डोंबिवलीच्या टाटा पॉवर ते खांबाळ पाडा रस्त्यावर खड्ड्यांची अक्षरशा चाळण झाली आहे. यामुळे वाहनांचे अपघातही झाले आहेत.
खड्ड्यांमुळे कल्याण डोंबिवकीकर त्रस्त झाले आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे अपघात होवून अनेकांचे बळी गेले आहेत. दगड माती डांबराचे ठोकळे टाकून बुजवले जाणारे खड्डे काही तासातच उघडे पडत आहेत. त्यामुळे अपघात घडतात. खड्ड्यांबाबत कायम स्वरुपी उपायोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरीक करत आहेत.