पालघर : भाजप खासदार चिंतामन वनगा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पालघरच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला आता सर्वच पक्षांनी सुरुवात केली आहे. कॉंग्रेस पक्षाने विजयाचा दावा केला आहे. मात्र पालघर मध्ये कॉंग्रेस की अवस्था बिकट असल्याच समोर आल आहे. मंगळवारी प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हण यांची जाहीर सभा वसईच्या भल्या मोठ्या माणिकपूर मैदानात आयोजित करण्यात आली होती.
अशोक चव्हाण त्यासाठी ४००० खुर्च्या लावल्या होत्या. मात्र २ तास उलटले तरी अवघे ५०० लोक देखील सभे साठी आले नाही. सभा घेण्यासाठी प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण हे सहा वाजल्या पासून वसईत आले होते. मात्र सभेची बिकट अवस्था पाहता ते २ तासांनी नऊ वाजता सभेसाठी आले. मात्र तरी देखील कॉंग्रेस कार्यकर्ते आणि पदाधीकारी गर्दी जमवू शकले नाही.
दरम्यान, गर्दी जमत नसल्याचे पाहून अखेर मैदानातील खुर्च्या जमा करून बाजूला केल्या. तर दुसरीकडे गर्दी जमवू न शकणाऱ्या हौशी कार्यकर्त्यानी चक्क फटके देखील फोडले. आणि अवघ्या ४५ मिनिटात ही जाहीर सभा आटोपती घेतली. असं असतानाही प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या पोट निवणुकीत आपण जिंकणार असल्याचा दावा केला आहे हे विशेष.