Gold Silver Price Today in Marathi : गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरांनी सार्वकालिक उच्चांक गाठला आहे. सोन्याचे दर काही महिने स्थिर होते. मात्र मार्च महिन्याच्या शेवटीपासून सोन्याच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली. तर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ग्राहकांनी सोनं खरेदीला उदंड प्रतिसाद दिला. ग्राहकांकडून सोने, चांदी, हिऱ्यांच्या दागिन्यांना मोठी मागणी होती. दागिन्यांच्या वाढत्या किमतींमुळे ही ग्राहकांचा उत्साह कमी झालेला दिसला नाही. ग्राहकांनी लग्न, समारंभ, गुंतवणुकीसाठी आणि रोजच्या वापरासाठी दागिन्यांच्यी खरेदी केली. दरम्यान एप्रिल महिन्यात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मार्चनंतर एप्रिल महिन्यात सोन्याने सर्वाधिक उच्च पातळी गाठली आहे. एप्रिलच्या दहा दिवसांत सोन्याचे दर गगनाला भिडल्या आहेत.
1 एप्रिलपासून सोन्याचा भाव 4,000 रुपये आणि चांदी 7,000 रुपयांनी महागले. 1 एप्रिल रोजी सोने 930 रुपयांना खरेदी केले. 2 एप्रिल रोजी 250 रुपये स्वस्त झाले. 3 एप्रिल रोजी किंमत 750 रुपयांनी वाढली. 4 एप्रिल रोजी 600 रुपये किमतीचे सोने खरेदी केले. 5 एप्रिल रोजी भाव 450 रुपयांनी कमी झाले. 6 एप्रिल रोजी सोन्याने 1310 रुपयांची खरेदी केली. 7 एप्रिल जैसे थे दर होते. 8 एप्रिल 300 रुपयांनी सोने महागले. 9 एप्रिल रोजी हेच सोने 110 रुपयांनी महागले. तर आज (10 एप्रिल) 22 कॅरेट सोन्याची किंमत 65,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 71,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
एप्रिलमध्ये सोन्यासह चांदीच्या दरात ही गेल्या 10 दिवसांत 7 हजार रुपयांनी दरवाढ झाली. 1 एप्रिलला चांदी 600 रुपये होती. 2 एप्रिलला 400 रुपयांनी महाग झाली. 3 एप्रिलला चांदी 2 हजारांनी महाग झाली. 4 एप्रिलला 1 हजार रुपयांनी तर 5 एप्रिलला 300 रुपयांनी किंमत घसरल्या. 6 एप्रिलला 1800 रुपयांची विक्रमी उडी चांदीने घेतलीय. त्यानंतर आज (10 एप्रिल) एक किलो चांदीचा दर 84,500 रुपये आहे. आज (10 एप्रिल) 24 कॅरेट सोने 71,832 रुपये, 23 कॅरेट सोने 71,544 रुपये, 22 कॅरेट सोने 65,798 रुपये, 18 कॅरेट सोने 53,874 रुपये, 14 कॅरेट सोने 42,022 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जाणार आहे. तर एक किलो चांदीचा भाव 82,100 रुपये आहे.