Government News : गडगंज पगार, सातत्यानं लागू होणारे वेतन आयोग आणि सुट्ट्यांच्या बाबतीतसुद्धा दिलासा असल्यामुळं अनेकांचाच कल सरकारी नोकरीकडे दिसून येतो. सध्याची तरुणाईसुद्धा (Corporate jobs) कॉर्पोरेट क्षेत्रांकडून सरकारी नोकऱ्यांकडे वळताना दिसत आहेत. अर्थात यामागे अनेक कारणं आहेत. सरकार देखील भरती प्रक्रियेच्या माध्यमातून युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देते. कारण कोरोना काळानंतर बेरोजगारीचे प्रमाण वाढले. त्यामुळे युवकांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारनं भरती प्रक्रिया राबवली आहे.
सध्या ही भरती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) यांच्या परभणी (Parbhani) विभागात विविध पदांसाठी निघालेली आहे. त्याची जाहिरातही करण्यात आली आहे. यासाठी ज्यांना अर्ज दाखल करायचा आहे त्यांना ऑनलाईन पद्धतीनं हा अर्ज करावा लागेल. या बाबतीत अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. (Government jobs application)
हेही वाचा : Prabhas आणि Kriti च्या चाहत्यांसाठी Good News! लवकरच उरकणार साखरपुडा?
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) यांच्या परभणी या विभागातील भरतीत तब्बल 57 जागा असून फक्त ऑनलाइन पद्धतीनं अर्ज करू शकतात. यामध्ये व्यावसायिक व तांत्रिक शिकाऊ उमेदवार पदांच्या 57 रिक्त जागांचा समावेश आहे.
जर तुम्हालाही अर्ज करायचा असेल तर त्यासाठीची शैक्षणिक पात्रता जाणून घ्या
MSRTC यांच्या या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी.
अर्ज करण्याची शेवटची तारिख
तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर 20 डिसेंबर 2022 पर्यंत करू शकतात.