Madhabi Puri Buch Profile Hindenburg Research : अदानी समुहावर आर्थिक अनियमिततेचा आरोप केलेल्या हिंडेनबर्गने सेबी प्रमुख माधवी बुच पुरी यांना टार्गेट केले होते. माधवी बुच पुरी यांच्याविरोधात आणखी एक मोठं प्रकरण उघडकीस आलंय. माधवी पुरी- बुच यांनी सेबी अध्यक्षपदाचा गैरवापर करत मॅक्स हेल्थकेअर आणि ऍक्सिस बँकेतील एक मोठा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न केलाय,असा दावा वरिष्ठ वकील आणि माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली हायकोर्टात केलाय. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं सेबी आणि सेबी प्रमुखांना खडे बोल सुनावले आहेत.
सेबी प्रमुख माधबी बुच-पुरी पुन्हा एकदा वादात सापडल्यात . वरिष्ठ वकील सुब्रमण्यम स्वामी यांनी सेबी प्रमुख माधबी बुच यांच्याविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केलीय. या याचिकेत गंभीर आरोप करण्यात आलेत. सुब्रमण्यम स्वामी यांनी 13 मार्च 2024 रोजी दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केलीय. या याचिकेत सेबी अध्यक्ष 4 फेब्रुवारी 2015 ते 3 एप्रिल 2017 पर्यंत मॅक्स हेल्थकेअर या संस्थेत अतिरिक्त संचालक आणि संचालक राहिल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यामुळे सेबीचे अध्यक्षपद आणि मॅक्स हेल्थकेअर संस्थेतील पदात परस्पर हितसंबंध गुंतल्याचा दावा याचिकेत केला आहे.
सेबी अध्यक्ष माधबी बूच आणि मॅक्स समूह यांचे जुने व्यावसायिक संबंध असले तरीही नियामक म्हणून कायद्यानुसार निर्णय घेणं ही सेबी अध्यक्षांची जबाबदारी आहे. सेबी अध्यक्ष म्हणून कर्तव्य बजावताना एखाद्या निर्णयावर व्यावसायिक संबंधाचा परिणाम दिसून आल्यास ते प्रकरण याचिकाकर्ता न्यायालयात सादर करू शकतात. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच इरडानं अॅक्सिस बँक आणि मॅक्स लाईफवर प्रत्येकी दोन आणि तीन कोटींचा दंड ठोठावला आहे,अशी माहिती कोर्टात दिली. पुढील कारवाईसाठी प्रकरण आरबीआय आणि सेबीकडे वर्ग केल्याचं सांगितलं
हिंडनबर्गच्या अहवालानंतर सेबी प्रमुख माधवी बुच यांच्याविरोधातील अनेक मोठी प्रकरण उघडकीस येत आहेत. तरीही सेबीकडून अद्याप माधवी बुच यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही हा प्रश्न उपस्थित होतोय. सेबी मुद्दाम या प्रकरणाकडे डोळेझाक करत आहे का ? सेबीला माधवी बुच यांच्याविरोधातील प्रकरणं दाबून टाकायचं आहे का ? असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतायेत.