Jitendra Awhad: राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री अणि राष्ट्रवादी कॉँग्रेस चे आमदार जितेंद्र आव्हाड हे आपल्या बेधडक वक्तव्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांना विरोधी गटाकडून अनेकदा धमकी येत असते. या पार्श्वभूमीवर एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. आव्हाडांच्या बंगल्यावर बॉम्ब ठेवल्याचे वृत्त समोर आले. यानंतर एकच खळबळ उडाली. काय घडला हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.
जितेंद्र आव्हाडांच्या ठाण्यातील नाद या बंगल्यात एक फोन आला. या बंगल्यात बॉम्ब ठेवल्याचे फोनवरुन सांगण्यात आले. फोन करणाऱ्याने आपले नाव सांगितले नाही. रात्री अचानक आलेल्या या फोनबद्दल पोलिसांना माहिती देण्यात आली. बॉम्ब असल्याच्या निनावी फोन मुळे पोलीस यंत्रणाही सतर्क झाली. त
ही घटना गांभीर्याने घेत बॉम्ब शोधक विभागाने तपासणी केली. पण या तपासणीत काहीही निष्पन्न झाले नाही. दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये आव्हाड यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अशा आशयाचे ट्विटदेखील त्यांनी केल होतं. दरम्यान फोन कॉल आल्याप्रमाणे काहीही निष्पन्न झाले नसल्याची माहिती वर्तक नगर पोलिसांनी दिली.
जितेंद्र आव्हाड आणि कुटुंबियांना विनाकारण त्रास देण्यासाठी कोणीतरी हा खोडसाळपणा करत असल्याचे मत कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. दरम्यान पोलीस फोन करणाऱ्याचा शोध घेत आहेत.
2 फेब्रुवारी रोजी जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट मुंबई पोलीस, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले होते. यामध्ये ते आपल्याला मारण्याचे प्लानिंग सुरु असल्याचे सांगत होते. यावेळी त्यांनी फोटोदेखील दाखवला.या फोटोमध्ये दिसत असलेला माणूस आणि त्याच्यासोबत असलेला आणखी एक गृहस्थ व्हिडिओ काॅलवर कुणाशी तरी बोलत होते, असे त्यांनी ट्वीटमध्ये दर्शविले आहे. मला मारण्यासंदर्भात त्यांच्यात चर्चा सुरू होती, असे त्यांनी सांगितले. त्यांची चर्चा एका पत्रकाराने ऐकली अन् माझ्यासोबत असणाऱ्या पोलीस आणि मुलांना सांगून सावध केले. मात्र, तेवढ्यात तो हातून निसटून हाॅटेल ट्रायडंटमध्ये 19 व्या मजल्यावर कुठे तरी गेला. ही बाब नंतर माझ्या कानावर घालण्यात आली. माझ्यासोबत असलेल्या मुलांनी त्याचा पाठलागही करण्याचा प्रयत्न केला. पण तो त्यांच्या हाती लागला नाही, असेही त्यांनी सांगितले होते. या ट्विटच्या बरोबर 2 दिवसांनंतर बॉम्बचा फोन आल्याने यंत्रणा सजग होती.
या फोटोमध्ये दिसत असलेला माणूस आणि त्याच्यासोबत असलेला आणखी एक गृहस्थ व्हिडिओ काॅलवर कुणाशी तरी बोलत होते. मला मारण्यासंदर्भात त्यांच्यात चर्चा सुरू होती. ती एका पत्रकाराने ऐकली अन् माझ्या सोबत असणाऱ्या पोलीस आणि मुलांना सांगून सावध केले. मात्र, तेवढ्यात तो हातून निसटून हाॅटेल… pic.twitter.com/Yp3b5OcGqK
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 2, 2024