धनंजय शेळके, झी मीडिया, मुंबई : राज्यात 1 जूनला लोकसभेच्या सर्व 7 टप्प्यातील मतदान संपल्यानंतर विविध वाहिन्या आणि संस्थांनी आप आपले एक्झिट पोल सांगितले आहेत. झी 24 तासच्या टीमने झी 24 तासच्या प्रत्येक जिल्ह्याती प्रतिनिधी, स्थानिक राजकीय अभ्यास यांच्या मदतीने काही अंदाज वर्तविले आहेत. हा सर्व्हे नाही तर अंदाज आहेत.
झी 24 तासच्या अंदाजानुसार राज्यात महाविकास आघाडी वरचढ ठरण्याची शक्यता आहे. महायुतीला केवळ 16 ते 20 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 28 ते 32 जागा मिळण्याची शक्यता आहे. अपक्षाची एका जागेवर सरशी होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात भाजपला 9 ते 12 जागा मिळण्याचा अंदाज असून शिवसेनेला 6 ते 7 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 1 जागा मिळण्याची शक्यता आणि महाराष्ट्रात काँग्रेसला 8 ते 10 जागा मिळण्याचा अंदाज आहे. राज्यात शिवसेना ठाकरे गटाला 10 ते 11 जागा मिळण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 6 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे. बरं, सांगलीची जागा अपक्षाच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे.
राज्यात महायुतीला 16 ते 20 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर राज्यात महाविकास आघाडीला 28 ते 32 जागा मिळण्याचा अंदाज तर अपक्षाला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे.
पक्ष | संभाव्य जागा |
भाजप | 9 ते 12 जागा |
राष्ट्रवादी अजित पवार गट | 1 जागा |
काँग्रेस | 8 ते 10 जागा |
शिवसेना ठाकरे गट | 10 ते 11 जागा |
राष्ट्रवादी शरद पवार गट | 6 ते 7 जागा |
अपक्ष | 1 जागा |
शिवसेना शिंदे गट | 6 ते 7 जागा |
महायुती एकूण / मविआ | अनुक्रमे एकूण- 16 ते 20/ 28 ते 32 जागा |
एकूण जागा 10
भंडारा- गोंदिया – भाजप
गडचिरोली-चिमूर – काँग्रेस
चंद्रपूर – काँग्रेस
नागपूर – भाजप
रामटेक – शिवसेना
यवतमाळ वाशिम – शिवसेना (उबाठा)
वर्धा – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
अमरावती – काँग्रेस
अकोला – काँग्रेस किंवा भाजप
बुलढाणा – शिवसेना
विदर्भाचे चित्र काय असेल ?
एकूण जागा - 10
विदर्भात काँग्रेसला 3 ते 4 च्या दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज भाजपाला केवळ 2 ते 3 जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवेसनेला 2 जागांचा अंदाज आहे, तर शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार यांना प्रत्येकी एक जागा मिळू शकते. विदर्भात भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता शिवसनेतील फुटीचा दोन्ही गटांना फटका बसण्याची शक्यता आहे. विदर्भात काँग्रेसला मोठा फायदा होताना दिसत आहे.
पक्ष | संभाव्य जागा |
काँग्रेस | 3 ते 4 |
शिवसेना | 2 |
शिवसेना ठाकरे गट | 1 |
भाजप | 2 ते 3 |
2019 मध्ये विदर्भात काय स्थिती ?
एकूण जागा - 10
भाजप – 5
काँग्रेस – 1
शिवेसना – 3
अपक्ष - 1
एकूण जागा- 8
नांदेड – काँग्रेस
परभणी – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट
हिंगोली – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट
लातूर – काँग्रेस किंवा भाजप
धाराशिव – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट
संभाजीनगर – शिवसेना
जालना – भाजप
काँग्रेस बीड – पंकजा मुंडे -भाजप
मराठवाडयात काय चित्र असेल ?
मराठवाड्यातील एकूण 8 जागांपैकी काँग्रेसला 1 ते 3 दरम्यान जागा मिळू शकतात. तर, भाजपला 1 ते 3 जागांचा अंदाज आहे. शिवसेना (उबाठा) गटाला 3 जागा मिळू शकतात. तर, शिवसेनेला केवळ एका जागेचा अंदाज आहे. मराठवाड्यात शिवसेना आणि भाजपला फटका बसण्याची शक्याता अधिक दिसत आहे.
पक्ष | संभाव्य जागा |
काँग्रेस | 1 ते 3 |
भाजप | 1 ते 3 |
शिवसेना ठाकरे गट | 3 |
शिवसेना | 1 |
2019 मध्ये इथं काय स्थिती?
एकूण जागा - 8
काँग्रेस – 0
भाजप – 4
शिवसेना – 3
एमआयएम - 1
पश्चिम महाराष्ट्रातील जागांचे अंदाज !
एकूण जागा - 10
माढा – राष्ट्रवादी – शरद पवार गट
सोलापूर – काँग्रेस
सातारा – राष्ट्रवादी शरद पवार गट
सांगली – अपक्ष
कोल्हापूर – काँग्रेस
हातकणंगले – शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट )
बारामती – राष्ट्रवादी शरद पवार गट
पुणे – काँग्रेस किंवा भाजप
शिरुर – राष्ट्रवादी - शरद पवार गट
मावळ – शिवेसना
पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 10 जागांपैकी काँग्रेसला 2 ते 3 जागांचा अंदाज आहे, तर भाजपला 0 ते 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी- शरद पवार गटाला इथं 4 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवेसना, शिवसेना ठाकरे गट आणि अपक्षाला प्रत्येकी एकाच जागेवर समाधान मानावं लागू शकतं. राष्ट्रवादी अजित पवार गटाला पश्चिम महाराष्ट्रात 0 जागांचा अंदाज आहे. थोडक्यात पश्चिम महाराष्ट्रात भाजप, शिवसेना, ठाकरे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला फायदा होण्याची शक्यता आहे.
पक्ष | संभाव्य जागा |
काँग्रेस | 2 ते 3 जागा |
भाजप | 0 ते 1 |
राष्ट्रवादी शरद पवार गट | 4 |
शिवसेना, ठाकरे गट, अपक्ष | 1 |
पश्चिम महाराष्ट्रात 2019 मध्ये काय स्थिती होती ?
एकूण जागा – 10
काँग्रेस – 0
भाजप – 4
राष्ट्रवादी – 3
शिवेसना - 3
एकूण जागा – 8
जळगाव – भाजप
रावेर – भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
धुळे – भाजप
नंदूरबार – काँग्रेस
अहमदनगर – भाजप
शिर्डी – शिवसेना ठाकरे गट
नाशिक – शिवेसना ( ठाकरे गट)
दिंडोरी – राष्ट्रवादी ( शरद पवार )
उत्तर महाराष्ट्र काय चित्र असेल?
उत्तर महाराष्ट्रातील एकूण 8 जागांपैरी काँग्रेसला 1 मिळण्याची शक्यता आहे, तर भाजपला 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे. शिवसेना उबाठाला 2 जागा मिळण्याचा अंदाज असून, एनसीपी-शरद पवार गटाला 1 किंवा 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात शिवसनेची पाटी कोरी राहण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रात 2019 ची काय स्थिती ?
काँग्रेस – 0
भाजप – 6
शिवेसना – 2
राष्ट्रवादी -0
एकूण जागा - ६
रायगड – राष्ट्रवादी शरद पवार गट
रत्नागिरी सिंधुदुर्ग – भाजप
ठाणे – शिवसेना
कल्याण – शिवसेना
भिवंडी – भाजप किंवा राष्ट्रवादी (शरद पवार गट)
पालघर – भाजप
कोकण काय चित्र असेल ?
कोकणातील सहा जागांपैकी 2 ते 3 जागांवर भाजपला विजय मिळेल. तर, शिवेसनेला 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. ठाणे आणि कल्याणमध्ये शिवसेनेची सरशी होण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला 0 ते 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे. पक्षातील फुटीचा कोकणात शिवसेना आणि ठाकरे गटाला फटका बसण्याची शक्यता आहे.
कोकणातील 2019 ची स्थिती
एकूण जागा- 6
शिवेसना – 4
भाजप – 1
राष्ट्रवादी - 1
एकूण जागा - 6
मुंबई उत्तर – भाजप
मुंबई उत्तर पश्चिम. – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट
मुंबई उत्तर पूर्व – शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट
मुंबई उत्तर मध्य– काँग्रेस
मुंबई दक्षिण मध्य – शिवेसना
मुंबई दक्षिण – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट
मुंबईतील चित्र काय असेल ?
एकूण 6 जागांपैकी मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकूण 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, भाजप, शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत महायुतीला फटका बसण्याची चिन्हं आहेत.
पक्ष | संभाव्य जागा |
शिवसेना ठाकरे गट | 3 जागा |
भाजप | 1 |
शिवसेना | 1 |
काँग्रेस | 1 |
मुंबईतील 2019 ची स्थिती
एकूण जागा 6
भाजप – 3
शिवेसना - 3
राज्यातील एकंदर चित्र पाहता आता इथं सत्तापालट होणार, की आणखी कोणतं नवं चित्र पाहायला मिळणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.