Amravati Graduate Election Result : अमरावती पदवीधर मतदारसंघात 23 तासांपासून मतमोजणी सुरुच, भाजपला धक्का

Amravati Graduate Election Result :  अमरावतीत भाजपला धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर आहेत. गेल्या 23 तासांपासून अमरावती पदवीधर मतदारसंघात मतमोजणी सुरुच आहे.

Updated: Feb 3, 2023, 07:39 AM IST
Amravati Graduate Election Result : अमरावती पदवीधर मतदारसंघात 23 तासांपासून मतमोजणी सुरुच, भाजपला धक्का title=
Amravati Graduate Election Result 2023

MLC Election Results : अमरावतीत भाजपला धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. (Amravati Graduate Constituency) महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर आहेत. गेल्या 23 तासांपासून अमरावती पदवीधर मतदारसंघात मतमोजणी सुरुच आहे. (Maharashtra Political News in Marathi) सकाळी 10 वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. (Amravati Graduate Election Result ) दुसऱ्या पसंतीची मतं मोजण्यास सुरुवात झाली आहे. विजयाचा कोटा पूर्ण कऱण्यासाठी 47 हजार 101 मतांची गरज आहे.(Maharashtra News in Marathi)

Maharashtra MLC Election Results 2023 LIVE :  विधान परिषदेत कोणी मारली बाजी, कोणाला किती मते पडली, पाहा अपडेट

 विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत आम्हीच चमत्कार करणार असा दावा भाजप-शिंदे गटाने केला होता. मात्र, त्यांना केवळ दोनच जागांवर समाधान मानावे लागले आहे. 5 पैकी 4 जागांचे निकाल जाहीर झालेत. यात महाविकास आघाडी 2, भाजप 1, अपक्ष 1 जागी विजयी झाले आहेत. तर अमरावतीची मतमोजणी 23 तासांपासून सुरु असून येथे महाविकास आघाडीचा उमेदवार आघाडीवर आहे. त्यामुळे आघाडीच्या खात्यात आणखी एक जागा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिल्याचे दिसून येत आहे.

कॉंग्रेसकडून धीरज लिंगाडे यांना उमेदवारी देण्यात आली तर दुसरीकडे भाजपने पुन्हा डॉ. रणजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. दुसऱ्या फेरीतील मतमोजणी पूर्ण झाली असून, दुसऱ्या फेरीनंतर लिंगाडे यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. भाजपचे रणजीत पाटील यांचे गोटात खळबळ माजली आहे. या ठिकाणी आता तणावाचे वातावरण आहे. भाजपने अवैध मतांची पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली आहे. याठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.

भाजपचे रणजित पाटील यांना 41005 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे धिरज लिंगाडे यांना 43383 मते मिळाली आहेत. दोघांच्या मतातील फरक जवळपास 2400 मतांचा आहे. मतांच्या फरकावरून समजते की, लिंगाडे यांची विजयाकडे वाटचाल सुरु आहे. अमरावतीत विजयी मताचा कोटा ठरला आहे. पहिल्या पसंतीची 46 हजार 927 मतांचा ठरला आहे. लिंगाडे यांना 43383 मते मिळाले असून ते विजयी मताच्या कोटाच्या जवळ आहेत. यामुळे लिंगाडेंची विजयाची शक्यता जास्त आहे.