मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधीच घोषित केला असता तर....' मविआच्या पराभवाबद्दल काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

Sushma Andhare on MVA defeat: आता ईव्हीएमवर निवडणुका होऊ द्यायच्या का नाहीत, हे सर्व पक्षांनी ठरवाव लागेल., असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

Pravin Dabholkar | Updated: Nov 23, 2024, 06:54 PM IST
मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधीच घोषित केला असता तर....' मविआच्या पराभवाबद्दल काय म्हणाल्या सुषमा अंधारे? title=
सुषमा अंधारे

Sushma Andhare on MVA defeat: विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोठा धक्का बसलाय.  मतपत्रिकेवर पुन्हा निवडणूक घ्या अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केलीय. महाराष्ट्राने मतदान केलं की ईव्हीएमने केलं? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय. आता शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाल्या सुषमा अंधारे? जाणून घेऊया. 

ज्या पद्धतीच्या जागा अविश्वसनीय आहेत. मी स्वत: अनेक जिल्ह्यात फिरली आहे. तिथलं वातावरण वेगळं होतं. ज्या ठिकाणच्या जागा दाखवल्या जात आहेत, त्या शॉकींग आहेत. येणारी लढाई ही ईव्हीएमविरुद्ध लढावी लागेल, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. भाजपचा स्ट्राइक रेट दाखवला जातोय, तसा कोणत्याही पक्षाचा नसतो. लोकशाहीचं सर्वात मोठं सौदर्य हे विरोधी पक्ष असतं. भाजपची असुरी सत्ताकांक्षा येणाऱ्या काळात या सौंदर्यालाच गिळंगृत करेल.आता ईव्हीएमवर निवडणुका होऊ द्यायच्या का नाहीत, हे सर्व पक्षांनी ठरवाव लागेल. आम्ही लोकसभेवेळीदेखील ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले. वायकरांनी आमची जागा चोरली. आमची ईव्हीएमबद्दलची लढाई कोर्टात सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. 

अंतर्गत बांधणी, जागा वाटपात काही अडचण आहे का?, प्रचाराच्या यंत्रणेत आम्ही कमी पडलोय का? हे आम्ही तपासू.  यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात, सुनिल प्रभू यांच्यासारखे निकाल धक्कादायक असल्याचे त्यांनी सांगितले. 

'...तर पाडापाडीच राजकारण झालं नसतं'

मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणं गरजेचं होतं. तर पाडापाडीच राजकारण झालं नसतं.कांग्रेस, राष्ट्रवादीने अपक्ष आमदार केले होते, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले.  सर्व सर्व्हेमध्ये महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे हेच होते, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. 'माझ्या पक्षाच्या लढलेल्या उमेदवारांचा अभिमान आहे. दिल्लीतून पैशांचा धो धो पाऊस पडत होता. एका मतासाठी साडेतीन हजारचा दर आम्ही ऐकला. तरी उमेदवार ताकदीनं लढत होते.आम्ही सामान्यातल्या सामान्य चेहऱ्याला असामान्य करतो. हा शिवसेनेचा यूएसपी आहे. महेश सावंत यांच्या निकालाने हे दाखवून दिल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या. 

महायुती स्टॅटर्जीमध्ये स्ट्रॉंग 

स्टॅटर्जीमध्ये ते स्ट्रॉंग ठरले.प्रत्येक मतदार सँघात 10 ते 20 अपक्ष उभे केले गेले, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले.