पित्ताशयातील खड्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान इतर अवयवांसोबत...; नाशिकमधील महिलेचा अनुभव धडकी भरवणारा

Nashik News Today: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेची शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचे समोर आले आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 5, 2024, 08:25 AM IST
पित्ताशयातील खड्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान इतर अवयवांसोबत...; नाशिकमधील महिलेचा अनुभव धडकी भरवणारा title=
nashik doctor booked for negligence of patient

Nashik News Today: आत्ताची जीवनशैली आणि धावपळीच्या आयुष्यामुळं लोकांना अनेक आजारांना तोंड द्यावे लागते. किडनी स्टोन आणि पित्ताशयातील खड्यांचा आजाराने खूप जण त्रस्त आहेत. नाशिक येथे एक याच आजारामुळं एक महिलेसोबत भयंकर प्रकार घडला आहे. नाशिक मध्ये अशाच एका घटनेमध्ये महिलेला लाखो रुपयांचा भुर्दंड तर पडलाच आहे. मात्र त्यासोबत एक ते दीड वर्ष ती अत्यवस्थ झाली होती. या प्रकरणात डॉक्टरचा हलगर्जीपणा कारणीभूत झाल्याने या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौम्य नायर असं या महिलेचे नाव आहे. केरळ मध्ये लग्न झालेल्या या महिलेने नाशिक मध्ये आपल्या माहेरी पित्ताशयातील मोठ्या आकाराच्या खड्यांचा उपचार करण्याचे ठरवले ऑपरेशन करण्यासाठी ती नाशिकच्या संतोष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गेली. डॉक्टरांनी केवळ एक तासात हे ऑपरेशन होईल व तुम्ही मोकळे व्हाल असं सांगितले. मात्र डॉक्टर संतोषराव लहाने यांनी तब्बल हे ऑपरेशन सहा ते सात तास केलं..डॉक्टरांनी मात्र सर्व ऑपरेशन व्यवस्थित झाल्याचा रिपोर्ट दिला. ऑपरेशन झाल्यावर महिलेला सातत्याने स्राव होत राहिल्याने तिला दीड वर्ष विविध शारीरिक समस्यांचा सामना करावा लागला. 

अखेर विविध तज्ञांशी चर्चा केल्यानंतर तिने पुणे येथे पुन्हा ऑपरेशन करत तीन दोन शस्त्रक्रिया केल्या. त्यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा वाटू लागली. तज्ञ डॉक्टरांनी खडे काढताना इतर अवयवांबरोबर अधिक छेडछाड केल्यामुळं आजूबाजूचे अवयव फाटल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी नाशिक जिल्हा रुग्णालयाकडे याबाबत तक्रार केली जिल्हा रुग्णालयानेही संतोष डॉक्टर संतोष रवलानी यांना दोषी ठरवलले. त्यानंतर  नाशिकच्या भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गेल्या वर्षभरात नाशिक जिल्हा रुग्णालयाकडे अशा दहा ते बारा तक्रारी आल्या आहेत. त्यातील बहुतांशी केसेस मध्ये डॉक्टरांची चूक असल्याचे आढळले. वैद्यकीय व्यवसायाकडे संशयाने बघितले जाते आहे. त्यामुळं आता आता गरज आहे ती डॉक्टरांच्या हॉस्पिटलची दर्जा तपासण्याची आणि त्यावर कारवाई करण्याची.