'Zee 24 Taas' Impact निर्दयी मुलाला घडली अद्दल! मरणासन्न अवस्थेत असलेल्या आईचा स्वीकार

'झी २४ तास'मुळे आठवली आईची माया, बातमीमुळे वृद्ध आईला मिळालं हक्काचं घर

Updated: Jul 3, 2021, 11:12 PM IST
'Zee 24 Taas' Impact निर्दयी मुलाला घडली अद्दल! मरणासन्न अवस्थेत असलेल्या आईचा स्वीकार title=

योगेश खरे, झी मीडिया नाशिक: झी 24 तासच्या बातमीनंतर अखेर नाशिकच्या भागीरथीबाई उडपी यांना न्याय मिळाला आहे. भागीरथीबाई उडपी यांचा दत्तक मुलगा त्यांना सोडून गेला होता. त्यांची अवस्था खूप बिकट होती. अशा परिस्थितीत मुलाची गरज असताना त्याने साथ सोडली. ही परिस्थिती झी 24 तासने समोर आणली आणि दत्तक मुलाचे डोळे उघडले. 

झी 24 तासच्या बातमीमुळे आईची काय अवस्था झालीये, हे मुलगा कमलाकर पाटील याला दिसलं.  त्यानंतर त्याला चुक लक्षात आली. त्यानं रुग्णालय आणि स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला आणि झाल्या प्रकाराची कबुली दिली. त्यानंतर रुग्णालयात येऊन त्यानं आईचा डिस्चार्ज केला आणि तिला घरी घेऊन गेला. आईची हडपलेली सर्व संपत्तीही तो परत करणार असून आता आईचा सांभाळ करणार असल्याचं त्यानं त्यानं झी 24 तासकडे कबुल केलं. 

भागिरथीबाई उडपी या नाशिकच्या सिडको भागात राहतात. अखेर त्यांना त्यांचं हक्काचं घर मिळालं. मुलगा मिळालाय आणि याला कारणीभूत ठरलीये झी २४ तासची बातमी. या हतबल आणि दुःखी आईची व्यथा आम्ही जगासमोर आणली.

भागिरथीबाईंचा दत्तक मुलगा कमलाकर पाटील यांनी देखील ही बातमी बघितली आणि त्यांचे डोळे खाडकन उघडले. अनाथ असताना या माउलीनं दिलेली माया आठवली. रुग्णालय आणि स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क करून त्यांनी आपल्या चुकीची कबुली दिली.

रुग्णालयात येऊन कमलाकर आपल्या आईला घेऊन गेले. यापुढे कायम त्यांचा सांभाळ करणार असल्याचं तसंच त्यांची हडपलेली संपत्तीही परत करण्याचं कमलाकर यांनी मान्य केलं आहे. झी 24 तासच्या बातमीमुळे मुलाला आईची माया आठवली आणि या वृद्ध माउलीला अखेर तिचा मुलगा परत मिळाला, याचं आम्हाला अत्यंत समाधान आहे.