पंढरपूर : नागरिकांच्या धर्म स्वातंत्र्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात उतारली आहे. त्यामुळं राज्य आणि केंद्र सरकारने भक्तांचा अंत न पाहता मंदिर प्रवेशास परवानगी द्यावी असं मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. दरम्यान वंचितचं पंढरपूर मंदिर प्रवेश आंदोलन हे शांततेच्या मार्गाने असणार आहे.
पंढरपूरातील आंदोलन ११ वाजता शांततेत पार पडेल. यावेळी मोजक्या लोकांनाच नामदेव पायरी पर्यंत सोडलं जाणार आहे. पोलीस प्रशासनाच्या विनंतीला प्रकाश आंबेडकरांनी प्रतिसाद दिलाय. शिवाजी पुतळ्यापासून मोजक्या लोकांना मंदिराकडे सोडलं जाणार आहे.
पंढरपुरात पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळतोय. पंढरपूरला छावणीच स्वरूप आलंय. लाखोंच्या संख्येने आंदोलन छेडण्याचा इशारा वंचितने दिला होता. त्यामुळे काही आंदोलनकर्ते सकाळपासून पंढरपुरात दाखल झालेयत.
सरकारने किती ही पोलीस फौज फाटा उभा केला आणि मंदिरात प्रवेश जरी नाही दिला तर वंचितचं आंदोलन हे पंढरपूर विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराला जाऊन धडकणार आहे असं मत प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरमध्ये व्यक्त केलं.