मुंबई : देशाच्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचं सत्र थांबता थांबत नाही आहे. आज नांदेडमध्ये पेट्रोलचा दर 92 रुपये 15 पैशांवर जाऊन धडकला आहे. शंभरी गाठायला अवघे ८ रुपये शिल्लक आहेत. तिकडे डॉलरच्या तुलनेत गेल्या आठवड्यात काहीसा सुधारलेला रुपया आज पुन्हा एकदा घसरला आहे. चलन बाजार उघडताच रुपया तब्बल १ टक्का घसरला. त्य़ामुळे एका डॉलरचा भाव साडे बाहत्तरच्या घरात गेला आहे. रुपयाच्या घसरणीनं कच्चा तेलाचं आयातमूल्य वाढतं आहे.
सोमवारी पेट्रोलच्या दरात 15 पैशांनी तर डिझेलच्या दरात 6 पैशांनी वाढ झाली आहे. सोमवारी या दरांनी उंची गाठली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर लवकर 90 रुपये प्रती लीटरचा आकडा गाठणार आहेत. तज्ञांच्या माहितीनुसार, येणाऱ्या काळात भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ होणार आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढी मागे रुपया हे सर्वात मोठं कारण आहे. रुपयांत घसरण होत असल्यामुळे तेल कंपन्यादेखील या दरात सतत बदल करत आहे. कंपनी डॉलरमध्ये तेलाचा दर ठरवते.