Petrol - Diesel Prices : पेट्रोल- डिझेलचे दर घटले; तुमच्या जिल्ह्यात काय आहे इंधनाची किंमत? पाहून घ्या

Petrol and Diesel Prices Latest Update : कितीसा फरक पडला? आजपासून लागू होत आहेत इंधनाचे नवे दर, किती फरकानं कमी झालंय पेट्रोल - डिझेल? पाहा सविस्तर वृत्त...

सायली पाटील | Updated: Mar 15, 2024, 07:26 AM IST
Petrol - Diesel Prices : पेट्रोल- डिझेलचे दर घटले; तुमच्या जिल्ह्यात काय आहे इंधनाची किंमत? पाहून घ्या  title=
Petrol and Diesel Prices Reduced by 2 rupees know latest rates in mumbai maharashtra marathi news

Petrol and Diesel Prices Latest Update :  देशात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार असून, निवडणूक आयोगाच्या वतीनं आगामी निवडणुकीची तारीखही जाहीर होण्याची चिन्हं आहेत. किंबहुना त्याबाबतच्या हालचालींनाही कमालीचा वेग आला आहे. एकिकडे निवडणुकीआधी देशात बऱ्याच घडामोडी सुरु असताना दुसरीकडे सत्ताधारी भाजपकडून आणि मोदी सरकारकडून मतदारांना अर्थात देशातील नागरिकांना फायदेशीर ठरतील असे काही मोठे निर्णय घेण्यात येत आहेत. याच पठडीतील एक महत्त्वपूर्ण निर्णय मोदी सरकारनं घेत अनेकांना दिलासा दिला आहे.  

वाहनधारकांसाठी हा निर्णय फायद्याचा ठरणार आहे. कारण, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रत्येकी 2 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळपासून इंधनाचे नवे दर लागू होणार असून, देशातील महत्वाच्या शहरांमध्ये काय आहेत इंधनाचे दर? 

हेसुद्धा वाचा : Latur LokSabha : विलासरावांच्या लातूरमध्ये भाजप हॅटट्रिक करणार? की काँग्रेसला सुर गवसणार?
 

शहरं पेट्रोल डिझेल
नवी दिल्ली   94.72 रुपये    87.62 रुपये 
कोलकाता 103.94 रुपये      90.76 रुपये   
मुंबई  104.21 रुपये      92.15 रुपये   
चेन्नई  101.15 रुपये     92.76 रुपये   
बंगळुरू 99.84 रुपये     85.93 रुपये   
जयपूर  104.88 रुपये     90.36  रुपये   
लखनऊ  94.65 रुपये     87.76 रुपये   

तुमच्या शहरात, जिल्ह्यात काय आहेत पेट्रोल- डिझेलचे दर? 

 शहर/ जिल्हा पेट्रोल डिझेल
अहमदनगर  104.53 रुपये    91.06 रुपये   
छत्रपती संभाजी महाराज नगर  105.66 रुपये   92.14 रुपये   
बीड  104.76 रुपये   91.27 रुपये   
जळगाव  104.66 रुपये    97.17 रुपये   
कोल्हापूर  104.84 रुपये   91.37 रुपये   
नागपूर  104.06 रुपये   90.62 रुपये   
नाशिक  104.78 रुपये    91.29 रुपये   
पालघर  104.17 रुपये    90.67 रुपये   
पुणे  103.76 रुपये    90.29 रुपये 
रायगड  104.06 रुपये    90.56 रुपये