रायगड : पुणे - मुंबई या मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. कर्जत - लोणावळा दरम्यान घाट परिसरात रेल्वे रुळावर दरड कोसळल्याने पुणे - मुंबई रेल्वे सेवा ठप्प पडली आहे. याचा फटका सह्याद्री एक्स्प्रेसला बसला आहे. ही गाडी थांबवून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. दरम्यान, कोसळलेली दरट हटविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
खंडाळा घाटात सह्याद्री एक्स्प्रेसच्या समोर दरड कोसळल्याने सह्याद्री एक्स्प्रेस सुमारे दोन ते तीन तास उशिराने धावत आहे. काही वेळापूर्वी सह्याद्री एक्सप्रेसला बॅक पुशद्वारे मधल्या रेल्वे मार्गाने पुणे दिशेकडे रवाना करण्यात येण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरड कोसळल्याने पुणे दिशेकडील सर्व मेल एक्स्प्रेस गाड्या मधल्या लोहमार्गाने पुणे दिशेकडे रवाना करण्यात आल्या आहेत. सह्याद्री एक्स्प्रेस व्यतिरिक्त सर्व मेल एक्स्प्रेस गाड्या सुरळीत असून त्या आपल्या वेळापत्रकानुसार धावत आहेत, असे सांगण्यात आले.