प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा: भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात दाखल झालेला हत्तींचा कळप (elephant video) पाहायला दुचाकीने जाणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले असून हत्तीनं मार्गात आलेल्या दुचाकीला अक्षरश: फुटबॉलसारखे (football matches) उडवून पायाखाली ठेचले आहे. सध्या हा व्हिडीओ तूफान (video viral) व्हायरल होत असून या व्हिडीओनं सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की एक बाईक रस्त्यावर लावलेली आहे आणि त्याच्याजवळच कुठेतरी हत्तीचा कळप येतो आणि जोरात लाथ मारत ती बाईक उडवून देतो. हा उडवण्याचा व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होतो आहे. त्यामुळे असा थरकाप उडवून टाकणारा व्हिडीओ पाहून सगळेच आवाक झाले आहे. काहींना तर हे थरकाप उडवून टाकणारे क्षण व्हिडीओतही टिपण्याचा मोह झालेला नाही. (the swamp of elephants throws a bike like football video goes viral)
चिरडल्याने दुचाकीचे नुकसान केले आहे. ही घटना लाखांदूर तालुक्यातील इंदोरा ते मेंढा मार्गावर घडली आहे. चप्राड येथील सुरेश दीघोरे आपला मित्रासोबत हत्ती पहायला दुचाकीने गेले होते. दरम्यान अचानक हत्तींचा कळप जवळ येता पाहता दुचाकी रस्त्यावर ठेवून तरुणांनी धूम ठोकली. मात्र त्याच वेळी कळपातील एका हत्तीने आपल्या मार्गात दुचाकी बघत दुचाकीला अक्षरश: फुटबॉलसारखे उडवून दिले. हा व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होतो आहे.
आतापर्यंत शेतशिवारात धुमाकूळ घालणा-या हत्तींनी प्रथमच गावात प्रवेश करून तीन घरांच्या भिंती पाडून तोडफोड केल्याचा प्रकार भंडारा (bhandara) जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील दहेगाव माईन्स येथे मध्यरात्रीच्या (midnight) सुमारास घडला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती होताच वन कर्मचा-यांनी गावात धाव घेऊन हत्तींना जंगलाच्या दिशेन हाकलून लावले. या प्रकाराने गावात भीतीचे वातावरण आहे. मध्यरात्रीच्या दहेगाव येथे शिरलेल्या हत्तींनी निताराम कुंडलिक करणकर, रामा यादवराव इरपाते, विठ्ठल जना कुंभरे, रामा यादवराव इरपाते (70) यांच्या घराची भिंत पाडून नुकसान केले आहे..विशेष 70 वर्षीय दिव्यांग असेलेले रामा त्यावेळी भिंतीला लागूनच खाटेवर झोपले होते, प्रसंगी वृद्धाच्या मुलाने आरडाओरडा केल्याने हत्ती पळून गेले. सुदैवाने रामा यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता वनविभागाने पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.