चेतन कोळस, झी मीडिया, येवला: सध्या वातावरण बदलांमुळे (Climate Change) सगळीकडेच पिकांचे नुकसान झाल्यांचे पाहायला मिळते आहे. अनेक ठिकाणी पिकांचे (farms) नुकसान झाले म्हणून सगळेच त्रस्त आहेत. त्यात शेतकरीही (Farmers) फार त्रस्त असल्याचे पाहायला मिळाले आहेत. अशाप्रकारे पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी तर हवालदिल आहेच परंतु मागणी (Demand in Market) वाढून पुरवठा कमी झाल्यानंही सामान्य ग्राहक (customers) हैराण झाले आहेत. मध्यंतरी कांद्याचे, गुळाचे भाव (Onion rates) आपल्याला वाढलेले दिसले. त्यामुळे आपल्या स्वयंपाक घरातील या वाढलेल्या वस्तूंच्या किमतींमुळे आपणही फार जास्त त्रस्त राहू लागलो होतो. पण याच पार्श्वभुमीवर आता एक वेगळीच बातमी (Maharashtra News) पाहायला मिळते आहे.
सगळ्या राज्यांमध्ये स्थानिक गावातील टोमॅटो (Tomato) येत असल्याने येत असल्याने टॉमेटोच्या भावात (Tomato Rates today) घसरण बघायला मिळत आहे जे कॅरेट 500 ते 600 रुपये विकली जात होती तीच आता 100 ते 80 रुपयाने विकण्याची वेळ टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यावर येत आहे. सध्या गृहिणींसाठी आणि ग्राहकांसाठी ही खुशखबर (Good news) असली तरी मात्र शेतकऱ्यांसाठी ही किंचित वाईट बातमी आहे. सध्या टोमॅटोची आवक वाढली आहे त्यामुळे किंमती कमी झाल्या आहेत. यामुळे ग्राहक आपल्या आवडीचे टॉमेटोचे विकत घेऊ शकता आणि त्यांचे पदार्थही बनवू शकता. चटणीपासून सूपपर्यंत (Tomato soup) तुम्ही चांगल्या गोष्टींचा सुगंध तुमच्या किचनमध्ये पसरवू शकता.
निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे टोमॅटोचे भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाले असून बेंगलोर (Banglore), राजस्थान, शिवपुरी, गुजरात या राज्यांमध्ये स्थानिक गावातील टोमॅटो येण्यास सुरुवात झाल्याने मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक वाढल्याने जे टोमॅटो पाचशे ते सहाशे रुपये कॅरेटने विकले जात होते ते आता 100 ते 80 रुपये कॅरेटने विकण्याची वेळ टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर येत आहे.
सध्या टॉमेटोचं भाव उतरल्यानं शेतकऱ्यांना पैसेही फार कमी मिळतं आहेत. त्यामुळे आता आपला खर्च कसा भागवावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यावर केलेला खर्च पाहून तो देखील कसा मॅनेज होईल असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. एवढेच नाही तर येथे केलेला उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल झाल्यानं औषधाचा खर्च तसेच कामगारांचा पगार कसा करावा असा मोठा प्रश्न टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यावर निर्माण झाला आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांसाठी (How to overcome tension) पुन्हा एकदा चिंतेची बाब निर्माण झाली आहे.