मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्टाईल स्टेटमेंटची सध्या चर्चा आहे... शिवसेनापक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा जेव्हा वावर असायचा, तेव्हा ते वेगळे दिसायचे... पण आता मुख्यमंत्री झाल्यावर, उद्धव ठाकरेंनी स्टाईल बदललीय.
उद्धव ठाकरे जेव्हापासून मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून ते शर्ट-पॅन्टमध्येच दिसत आहेत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा ते भगव्या कुर्त्यामध्ये दिसले... दुसऱ्या दिवशीही त्यांनी तोच कुर्ता पुन्हा परिधान केलेला दिसला. पत्रकारांनी त्यांना त्यांच्या कुर्त्याबद्दल प्रश्नही विचारला 'कुठल्याही लाँड्रीत दिला तरी हा रंग जाणार नाही' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं खरं... पण, त्यानंतर उद्धव ठाकरे सातत्यानं शर्ट पँटमध्येच दिसत आहेत.
कदाचित, यामागे आपण मुख्यमंत्री असण्यापेक्षा प्रशासक आहोत, हा मेसेज उद्धवना द्यायचा असेल... नेतेगिरीची झूल बाजूला ठेवून कॉमन मॅनचं प्रतिनिधित्व सिद्ध करायचं असेल... धारदार आणि आक्रमक प्रतिमा थोडी सोबर करण्याचाही प्रयत्न असेल किंवा तरुणांशीही रिलेट करण्याचा उद्धव यांचा प्रयत्न असेल.
प्रत्येक मुख्यमंत्र्यांची स्वतःची अशी वेगळी स्टाईल होती. शरद पवार कायम पांढरी सफारी किंवा पांढऱ्या शर्ट-पॅण्टमध्येच दिसायचे. विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदेंची सफारी पेटंट होती. अशोक चव्हाणही बऱ्याच वेळा सफारीतच दिसायचे. पृथ्वीराज चव्हाणांनी जॅकेटची स्टाईल आणली. तीच पुढे देवेंद्र फडणवीसांनाही आवडली... आणि आता उद्धव ठाकरे...
आतापर्यंत काही अपवाद सोडले तर मुख्यमंत्री कायम पांढरे कुर्ते, जॅकेट, सफारी किंवा स्टार्च आणि कडक इस्त्री केलेल्या कपड्यांतच दिसले... पण महाराष्ट्राचे हे नवे मुख्यमंत्री थोडे दिसत आहेत.