...म्हणून निकालासाठी होणार संध्याकाळ, पाहा किचकट मतमोजणी प्रक्रिया

Updated: Jun 28, 2018, 12:29 PM IST

मुंबई : विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ, आणि कोकण पदवीधरच्या मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या निवडणूकीची मतमोजणी सुरु आहे.  विधानपरिषदच्या 3 जागांसाठी मुंबई आणि कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक मतदासंघासाठी मतमोजणी प्रकिया नवी मुंबईतील नेरुळ इथल्या आगरी कोळी सांस्कृतिक भवन इथे सुरू झाली आहे. ही मतमोजणी प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू रहाणार आहे.  मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेना आणि भाजपने आपली ताकद पणाला लावली  होती.  मतपत्रिकांच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया झालीय. उमेदवारला मिळालेल्या पसंतीच्या मतदानानुसार निकाल घोषित होणार आहे. यामुळे प्रत्यक्ष निकाल लागायला संध्याकाळ उजाडणार आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमकी प्रक्रिया काय आपण जाणून घेऊयात..

सेना-भाजपात टक्कर  

भाजपकडून अमितकुमार मेहता आणि शिवसेनेकडून विलास पोतनीस तर स्वाभिमानकडून राजू बंडगर तर अपक्ष म्हणून दीपक पवार रिंगणात होते.  मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेकडून शिवाजी शेंडगे, लोकभारतीचे कपील पाटील आणि भाजप पुरस्कृत अपक्ष अनिल देशमुख यांच्यात लढत रंगली. कोकण पदवीधरसाठी भाजपकडून निरंजन डावखरे, राष्ट्रवादीकडून नजीब मुल्ला, तर शिवसेनेकडून संजय मोरे रिंगणात होते. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे अनिकेत पाटील , शिवसेनेतर्फे किशोर दराडे तर राष्ट्रवादीतर्फे संदीप त्र्यंबक बेडसे आणि प्रतापदादा सोनावणे यांच्यात चुरस झाली होती.