मुंबई : टाटा समूहाचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री (Cyrus Mistri) यांचा रस्ते अपघातात मृत्यू झालाय. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर जवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, मिस्त्री यांची मर्सिडीज कार (Cyrus Mistry car) रस्ता दुभाजकाला जाऊन धडकली. यावेळी कारमध्ये चार जण प्रवास करते होते. अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह दोन जणांचा मृत्यू झालाय. मिस्त्री यांना रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील म्हणाले की, अहमदाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या सूर्या नदीच्या पुलावर दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झालाय. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर अन्य दोन जण जखमी आहेत.
Former Chairman of Tata Sons Cyrus Mistry died in a car crash at around 3pm in Maharashtra's Palghar area. A total of 4 people were there in the vehicle; two, including Cyrus Mistry, died: Palghar Police pic.twitter.com/7sE8PgPUno
— ANI (@ANI) September 4, 2022
सायरस मिस्त्री पल्लोनजी मिस्त्री यांचा लहान मुलगा होता. त्यांचा जन्म 4 जुलै 1986 रोजी झाला होता. लंडन बिझनेस स्कूलमधून त्यांनी मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवीही घेतली होती. सायरस 1991 मध्ये कौटुंबिक व्यवसायात आले. 1994 मध्ये शापूरजी पालोनजी ग्रुपचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने भारतातील सर्वात उंच निवासी टॉवर, सर्वात लांब रेल्वे पूल आणि सर्वात मोठे बंदर बांधले. पालोनजी ग्रुपचा व्यवसाय कपड्यांपासून रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस ऑटोमेशनपर्यंत पसरलेला आहे.
Maharashtra | Former Chairman of Tata Sons, Cyrus Mistry died in a car crash at around 3pm in the Palghar area today
A total of four people were travelling in the vehicle; two, including Cyrus Mistry, died, said police. pic.twitter.com/n48hZirTeQ
— ANI (@ANI) September 4, 2022
28 जून 2022 रोजी सायरसचे वडील आणि बिझनेस टायकून पल्लोनजी मिस्त्री यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले होते. सायरस आणि त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर आता त्याच्या कुटुंबात त्यांची आई पॅट्सी पेरिन दुबास, शापूर मिस्त्री तसेच लैला मिस्त्री आणि अलु मिस्त्री या दोन बहिणी आहेत.
सायरस मिस्त्री हे टाटा सन्सचे सर्वात तरुण चेअरमन होते. टाटा सन्समध्ये मिस्त्री कुटुंबाची 18.4 टक्केची भागीदारी आहे. टाटा ट्रस्टनंतर ते टाटा सन्समध्ये दुसऱ्या क्रमांकाचे शेअरहोल्डर आहेत.