मुंबई : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Aanand Dighe) म्हणजे ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) अशी त्यांची ओळख होती. कट्टर शिवसैनिक असलेल्या आनंद दिघे यांची लोकप्रियता संपूर्ण राज्यात होती. ते जेवढे लोकप्रिय होते तेवढीच लोकप्रियता त्यांच्या अरमाडा गाडीला देखील होती. आनंद दिघे यांच्या गाडीला अपघात झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या दरम्यान हदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं.
आनंद दिघे आज आपल्यामध्ये नाहीत. पण त्यांची गाडी 20 वर्षानंतर ही आपल्याला त्यांची आठवण करुन देते. आनंद दिघे यांनी 1970 च्या दरम्यान शिवसेनेला ठाण्यात मोठं केलं. कल्याण-डोंबिवली, पनवेल सारख्या भागात त्यांचं वर्चस्व होतं. आनंद दिघे आपल्या आरमाडा गाडीतून विविध ठिकाणी दौरा करायचे.
आनंद दिघे याच गाडीतून दौरा करायचे आणि ठाणे जिल्हा पिंजून काढायचे. शिवसेनेने आनंद दिघे यांची गाडी पुन्हा डागडुजी करुन सुस्थितीत ठेवली आहे. त्यांच्या अनेक वस्तू देखील या गाडीत ठेवल्या आहेत. एकदा याच गाडीने जात असताना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या काही गुंडांनी आनंद दिघे यांच्यावर हल्ला केला होता. पण ते या हल्ल्यात वाचले होते.
या गाडीतून भारताचे माजी पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी देखील प्रवास केला आहे. मोठ्या मोठ्या नेत्यांमध्ये आनंद दिघे यांचा दरारा दिसत असे.